- सुदैवाने प्राणहानी नाही ; अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद
- बघा सीसीटीव्ही फुटेज चे व्हिडिओ
बल्लारपुर -
बल्लारपुरात मन हेलवून टाकणारा अपघात स्टुडिओ कलाकेंद्र समोर घडला याच कलाकेंद्र स्टुडिओत लागलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. "जाको राखे साईंया मार सके न कोय" या म्हणी नुसार घटनेचे फुटेच पाहताच अंगावर शहारे येतात. घटना अशी कि, एका वयोवृद्धाला धडक दिल्यानंतर ट्रक वृद्धांच्या वरून जातो पण वयोवृद्ध वाचतो. या अपघातात जखमी झालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वास्तविक ही घटना काल संध्याकाळी पाच वाजता घडली. बल्लारपूर शहरातील फुलसिंग नाईक प्रभागात राहणारे शंकर मल्लाराम हे 70 वर्षीय व्यक्ती रुग्णालयात जाण्यासाठी पायीच घरून निघाले होते. वाटेत एक ट्रक रस्त्यावर उभा होता, मग तो वृद्ध, बाजूने ट्रक ओलांडत ट्रकच्या समोर पोहचला आणि पुढे जात होता, अचानक ट्रक चालकाने ट्रक चालवला आणि वृद्धाला पाडत पुढे गेला, वयोवृद्ध ट्रक समोर असल्याने ट्रक चालकाला ते दिसले नाही. त्यामुळे ट्रक चालकाला हे देखील माहित नव्हते की कोणीतरी गाडीखाली आले आहे आणि अपघात झाला आहे आणि तो ट्रक तिथून निघून गेला, या घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाले पण त्यांचे प्राण वाचले.
ज्याने ही घटना पाहिली, त्याच्या अंगावर शहारे आले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी जखमी वृद्धाला रुग्णालयात नेले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वृद्धाच्या कुटुंबीयांनी ट्रक चालकाविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे, पोलीस या ट्रकचा आणि ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.
बघा सीसीटीव्ही फुटेज चे व्हिडिओ







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.