- मोबाईल, गाडीचे चाके, जुनी टुव्हीलर नंतर आता सायकलही सुरक्षित नाही
- वाढत्या चोऱ्यांच्या घटनेवर आळा घालण्याकरिता घराबाहेरील परिसरात सीसीटीव्ही लावणे काळाची गरज
राजुरा -
मागील काही महिन्यापासून शहरात चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाली असून वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महागड्या चारचाकी वाहनांचे टायर, जवाहर येथील पत्रकाराच्या घरून चोरी प्रकरण ताजे असतांना स्थानिक राजीव गांधी चौकातील सिंधू स्मृती अपार्टमेंट मध्ये एका ब्लॉक मध्ये राहणाऱ्या चार मित्रांचे अंदाज तीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल हँडसेट अज्ञात चोरटयांनी लंपास केले. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस चोरट्यांच्या शोध घेत आहे.
शनिवारी संतोष उरकुडे नामक मजुरीचे काम करणाऱ्या व्यक्तीने आपली दुचाकी क्रमांक एमएच ३४ आर ०८५८ अमराई वॉर्डात ठेऊन महागडे पेट्रोल वाचावे म्हणून मित्राच्या गाडीने सकाळी ११ च्या सुमारास काही कामाकरिता वेल्डिंगच्या दुकानात गेला. दुपारी ४.१५ च्या सुमारास परत आल्यावर त्याला आपली दुचाकी न दिसल्यास त्याने इकडे तिकडे पुचारपूस केली. मात्र दुचाकी मिळाली नाही.
दुसऱ्या घटनेत सोमवार दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास इंदिरा नगर मध्ये राहणारा सुरेश पोहनकर हा पेंटिंगचा व्यवसाय करणारा इसम नाका नंबर ३ जवळ बॅनर च्या दुकानात गेला, १५-२० मिनिटात परत आल्यावर त्याला आपली सायकल दिसली नाही त्यानेही इकडे तिकडे पुचारपूस केली मात्र सायकल मिळाली नाही व त्याने २ किमी पायी चालत आपले घर गाठले. दुचाकी व सायकल मालकाने पोलिसात रिपोर्ट केली कि नाही हि माहिती मात्र मिळू शकली नाही.
वाढत्या चोऱ्यांच्या घटनेवर आळा घालण्याकरिता सीसीटीव्ही लावणे काळाची गरज
दारूबंदी उठल्यानंतर चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याची ओरड आता मात्र नागरिक करू लागले आहेत. प्रशासनाने तसेच सघन व्यापारी व नागरिकांनी आपआपल्या घराच्या व परिसराच्या सुरक्षेकरिता सीसीटीव्ही लावणे भविष्याच्या दृष्टीने आवश्यक झाले आहेत. वाढत्या चोऱ्यांच्या घटनेवर आळा घालण्याकरिता सीसीटीव्ही लावणे आता काळाची गरज झाली आहे.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.