Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कठीण परिश्रमातून विद्यार्थी घडतो - सुधाकर कुंदोजवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्व.प्रभाकरराव मामुलकर यांच्या द्वितीय स्मृिदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - ग्रामीण भागाती...
  • स्व.प्रभाकरराव मामुलकर यांच्या द्वितीय स्मृिदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, योग्य मार्गदर्शन मिळाले झाले तर विद्यार्थी इतिहास घडवू शकतो, कठीण परिश्रमातून विद्यार्थी घडत असतो असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार यांनी केले. ते शिक्षण महर्षी माजी आमदार स्व.प्रभाकरराव मामुलकर यांच्या द्वितीय स्मृिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अँड. संजय धोटे, दतात्रय येगिनवार, मुर्लीधरराव धोटे, प्राचार्य डि.बी. भोंगळे, साजिद हुसेन बियाबानी, सुमनताई मामुलकर, प्राचार्य जोसेफ, प्राचार्य एस.एम.वारकड, अड. अरुण धोटे, प्रा. राजेश खेरानी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी महािद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम वारकड, संचालन प्रा. सुवर्णा नलगे तर आभार प्रा.राजेश खेराणी यांनी केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विज्ञान केतकी धुमने, प्रज्वल सातपुते, जागृती सुरलकर, कला नामदेव देवकते, वीरेंद्र कुडगिर, पांडुरंग वाघमोडे, वाणिज्य ज्ञानेश्वरी राऊत, सुप्रिया चंकापुरे, विद्या दुर्गे एम सी वी सी प्रणाली सत्रे, रोशनी निषाद, करण जुणघरी, बेटी बचाव बेटी पढाव स्पर्धेत प्रथम साक्षी वनकर, द्वितीय स्वाती मोहुर्ले, कोयना आकनुरवार, निबंध स्पर्धेत आचल खंडाळे, कोमल वाघमारे, आशा साळवे, प्रतीक्षा शेंडे, प्रगती सुररकर, वादविवाद स्पर्धा नामदेव देवकाते, रोशन चने, सिद्धार्थ चव्हाण, प्रतीक्षा वासनिक तसेच राष्ट्रीय सेवायोजनेच्या पुरस्कार प्राप्त झाले या बद्दल प्रा. गुरुदास बल्की यांच्या चमुचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेअंतर्गत कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी पीएचडी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top