Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्राथमिक आरोग्य केंद्राला कपाट भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली असतांना आवश्यक असलेल्या वस्तूंची प...
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली असतांना आवश्यक असलेल्या वस्तूंची पूर्तता तात्काळ होत नाही आहेत हे पाहत कढोली (बु) ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच राकेश हिंगाणे यांना कन्यारत्न प्राप्त झाले तो आनंद द्विगुणित करण्याकरिता १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली (बु) कार्यालयाला औषधी व कागदपत्र ठेवण्याकरिता कपाट व दिवाल घडी भेट देण्यात आली. आरोग्यकेंद्रा करीता आपल्या कडून छोटीशी भेट देऊन आरोग्य केंद्रला सहकार्य केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीन कुमार ओदेला यांनी आभार व्यक्त केले. भेट स्वीकारतांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सोनकुसरे, डॉ. गोरे, परिचारीका, सहायक कर्मचारी प्रकाश दशरथ हिंगाणे, प्रकाश तुळशीराम हिंगाणे उपस्थित होते. समोर कुठल्याही प्रकारे मदतीची आवश्यकता पडल्यास मी पुन्हा धाऊन येईल असे आश्वासन राकेश जी हिंगाणे यांनी दिले. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top