Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अखंड भारत संकल्प दिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - उपसंपादक राजुरा - दि. १५ ऑगस्टच्या पूर्व संध्येला विश्व हिंदू परिषद व बजरंगदल प्रखंड राजुरा द्वारे युवा पिढीला अखंड भारत दिनाच...
अनंता गोखरे - उपसंपादक
राजुरा -
दि. १५ ऑगस्टच्या पूर्व संध्येला विश्व हिंदू परिषद व बजरंगदल प्रखंड राजुरा द्वारे युवा पिढीला अखंड भारत दिनाचे महत्व समजावे आणि राष्ट्र पुनरुत्थानासाठी समाजातील सर्व तरुणांनी पूर्ण ताकदीने एकत्र यावे, देशाला परम वैभवाला नेण्यासाठी तन आणि मनाने समोर यावे यासाठी हा स्मरण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पर्वावर भारत मातेची आरती, देश भक्ति गीत, हनुमान चालीसा चे सुंदर प्रस्तुतीकरण गायक मनोज मिश्रा व उमेश शाहा यांनी सादर केले. 
कार्यक्रमात विहिंप जिल्हा मंत्री सत्यनारायण खेंगर, रूपेश भाकरे जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख, विनय आक्केवार प्रखंड संयोजक बजरंग दल, अंकुश घटोले प्रखंड मंत्री विहिंप, सारंग रामगीरवार प्रखंड उपाध्यक्ष, विहिंप, प्रफुल घोटेकर नगर संयोजक बजरंग दल, संदेश दुर्गे प्रखंड सह संयोजक, व्यंकटेश कदम प्रखंड सप्ताहिक मिलन प्रमुख, शुभम आक्केवार शाखा प्रमुख प्रदीप देशपांडे रा. स्व. संघ संयोजक, सोमेश्वर आईटलावर, सचिन भटारकर, जयपाल ठाकुर, अनिल पवार, चेतन निमकर, विजय हजारे, श्रीकांत रेक्कलवार इत्यादी उपस्थित होते. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top