Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर व्यापारी मंडळातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर व्यापारी मंडळा तर्फे 75 वा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम टिळक मैदान स्थित कार्यालयात उत्...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर व्यापारी मंडळा तर्फे 75 वा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम टिळक मैदान स्थित कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता नियोजित वेळी सदस्यांच्या भव्य उपस्थितीत झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावर्षी नव्यानेच स्थापन झालेल्या FTCI ह्या संस्थेच्या सर्व सदस्यांना देखील ह्या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. FTCI च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामकिशोर सारडा आणि सचिव अनिल टहलियानी ह्या कार्यक्रमास उपस्थित होते. मागील वर्षीच्या करोनाच्या भीतीदायक परिस्थिती नंतर आज प्रथमच इतका मोठा कार्यक्रम झाल्यामुळे सदस्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. झेंडावदन मंडळाचे अध्यक्ष रामजीवन परमार ह्यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे सहसचिव श्रीकांत ताटपल्लिवार ह्यांच्या मार्गदर्शनात झेंड्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हटले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्रभाकर मंत्री ह्यांनी दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये परमार ह्यांनी करोना काळामध्ये चंद्रपूर व्यापारी मंडळाने महानगरपलिकेच्या मदतीने जो RTPCR टेस्ट कॅम्प आयोजित केला त्याची माहिती दिली व तसेच FTCI च्या मदतीने जो Vaccination कॅम्प आयोजित केला त्याबद्दल माहिती दिली. मंडळाच्या ह्या कॅम्पमध्ये आतापर्यंत अंदाजे 4500 व्यापारी व गरजू लोक लाभांवित झाले ही माहिती त्यांनी उपस्थितीताना दिली व असेच लोकोपयोगी कार्य मंडळातर्फे ह्या पुढेही आयोजित करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. ज्या-ज्या व्यापाऱ्यांनी मंडळाच्या ह्या कार्या मध्ये सहकार्य केले त्यांचे आभार त्यांनी मानले. त्यानंतर मंडळाचे सचिव प्रभाकर मंत्री ह्यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली. अशी माहिती संस्थेचे सदस्य सागर चिंतावार ह्यांनी दिली. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top