Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, खेळ खेळणे आवश्यक - आमदार सुभाषभाऊ धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फ्रेंड्स स्पोर्टींग क्लबच्या बैडमिंटन कोर्ट चे उद्घाटन बैडमिंटन कोर्टने टाकली कात ; बैडमिंटन कोर्ट आता नव्या रूपात आमचा विदर्भ - ब्युरो रिपो...
  • फ्रेंड्स स्पोर्टींग क्लबच्या बैडमिंटन कोर्ट चे उद्घाटन
  • बैडमिंटन कोर्टने टाकली कात ; बैडमिंटन कोर्ट आता नव्या रूपात
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सक्रिय राहणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत खेळ हे एक शक्तिशाली माध्यम आहे. खेळांद्वारे तुम्ही तंदुरुस्त राहाल. जर शरीर तंदुरुस्त असेल तर मन देखील सकारात्मक आणि सर्जनशील असेल. म्हणून आपले कर्तव्य करत असताना, दिवसातून काही वेळ स्वतःला खेळांमध्ये व्यस्त ठेवा असे प्रतिपादन आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी केले ते फ्रेंड्स स्पोर्टींग क्लबच्या बैडमिंटन कोर्टच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 
फ्रेंड्स स्पोर्टींग क्लबच्या शहरातील एकमात्र बैडमिंटन कोर्टने कात टाकली असून आता नव्या रूपात ते खेडाळुकरिता खुले करण्यात आले आहे. नगर परिषदेने याकरिता २.५० लाख रुपये निधी दिला होता. या निधीतून नुकतीच या बॅडमिंटन कोर्टाचे मॅटिंगचे काम पूर्ण करण्यात आले या सोबतच एयरफिल्टर व स्वच्छतागृहाला पण आधुनिकरुप देण्यात आले. जीम व उर्वरित कामाकरिता आमदार सुभाष धोटे यांनी १० लाख रुपयाचा निधी देणार  असल्याचे सांगितले. 
१५  ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते या बैडमिंटन कोर्टचे उदघाटन पार पडले यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, पंस माजी सभापती कुंदाताई जेणेकर, नप बांधकाम सभापती हरजीत सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता फ्रेंड्स स्पोर्टींग क्लबचे सदस्य पी.यु. बोंडे, रवी जामुनकर, संदीप जैन, हरभजनसिंग भट्टी, प्रशांत गोठी, शंकर झंवर, गणेश रेकलवार, बद्री चन्ने, राकेश नामेवार, डॉ. अशोक जाधव, डॉ. राज कतवारे यांनी परिश्रम घेतले.
शहरातील नामवंत नागरिक, मोठे अधिकारी, डॉक्टर्स, वकील स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकरिता दररोज सकाळी येथे बॅडमिंटन खेळात असतात हे येथे विशेष. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top