Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेकोलिने नाले आपसात जोडल्याने गोवरी गावात व शेतशिवारात पूर सदृश्य स्थिती - बबनभाऊ उरकुडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
३०० एकरच्या वर शेती व २५० च्या वर घरे आली होती पाण्याखाली वेकोलीविरुद्ध मोठा एल्गार - गावकरी जनआंदोलनाच्या तयारीत खदान परिसरात सामूहिक आत्मद...
  • ३०० एकरच्या वर शेती व २५० च्या वर घरे आली होती पाण्याखाली
  • वेकोलीविरुद्ध मोठा एल्गार - गावकरी जनआंदोलनाच्या तयारीत
  • खदान परिसरात सामूहिक आत्मदहनाचा इशारा
  • पूर ओसरला, डोळे मात्र ओलेच
  • वाचा सविस्तर... बघा व्हिडीओ....
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
मुसळधार पावसाने राजुरा तालुक्याला हालवून टाकले आहेत. तीन दिवस संततधार पाऊसाने नाले उसंडून नाले वाहू लागल्याने शहर व ग्रामीण भागांची दैना झाली होती. शेकडो एकर शेत्या पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाल्या. गोवरी जवळचे नाले वेकोलिने आपसात जोडल्याने भूतकाळात कधी नव्हे अशी स्थिती यावेळेस पाहावयास मिळाली वेकोलिने नाल्याना आपसात जोडल्याने गोवरी गावात व शेतशिवारात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली. जवळपास ३०० एकरच्या वर शेती व २५० च्या वर घरे पाण्याखाली या नाल्याच्या पाण्यामुळे प्रभावित झाली असा आरोप शिवसेना राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांनी लावला आहे. 
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर क्षेत्रात येणाऱ्या कोळसा खाणींच्या विस्ताराच्या प्रक्रियेदरम्यान, चार नाले वळवून त्यांना दोन नाल्यात जोडण्यात आले. खाणीच्या बाजूला नाल्याच्या बाजूला मातीच्या ढिगामुळे पाणी शेतात जाते. नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे गोवरी गलगतची सुमारे तीनशे ते चारशे एकर शेती व गोवरी गावाचे २५० हुन अधिक घरे बाधित झाली होती. जेव्हा जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा तेव्हा गोवरी, वरोडा, निमणी, साखरी, पोवणी इत्यादी सर्व गावांचे पाणी नाल्यात येते. त्यामुळे गोवरी गावाची शेती पाण्याखाली बसते, शेतीच्या पाण्याला पूर आल्याने पिकांचे नुकसान होते. याबाबतीत वेळोवेळी वेकोलि महाव्यवस्थापक, उपक्षेत्रीय व्यवस्थापक, खदान व्यवस्थापक यांना विनवनीकरूनही त्यांनी यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे दरवर्षी १०-१५ शेतकऱ्यांचे नुकसान होत होते मात्र २२ जुलैला आलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः संपूर्ण परिसराला जलमग्न केले. जवळपास ३०० एकरच्या वर शेती व २५० च्या वर घरे या नाल्याच्या पाण्याखाली आली. संतापलेल्या गावकऱ्यांनी शिवसेना राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांचेशी संपर्क साधत आपबिती सांगितली. बबनभाऊ तात्काळ एक्शनमोड मध्ये येत त्यांनी उपक्षेत्रीय व्यवस्थापक व खान व्यवस्थापक यांना गोवरी गावात आणले व पाण्याखाली आलेले गाव दाखवले. जोपर्यंत वेकोलि प्रशासन यावर तोडगा काढणार नाही तोपर्यंत आम्ही या दोघांना सोडणार नाही अशी भूमिका संतप्त शेतकऱ्यांनी घेतल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली. वेकोलि सुरक्षा कर्मचारीही गावात दाखल झाले. तेव्हा बबनभाऊ उरकुडे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून याबाबत महाप्रबंधकांशी चर्चा करून तोडगा काढू म्हणत सोडले. 
दुसऱ्या दिवशी बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात १०-२० शेतकऱ्यांनी महाप्रबंधक कार्यालयात बैठक घेतली. याबैठकीत वेकोलि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा आरोप बबनभाऊ उरकुडे यांनी लावला. वेकोलि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लवकरच सेक्शन ४ लागत असल्याची थाप दिली. उरकुडे यांनी नाले आपसात का जोडले विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवी ची उत्तरे दिली. बबनभाऊ उरकुडे यांनी सांगितले कि, १९९५ ला एक व २००६ ला एक अशी नाले जोडायची परवानगी प्लानिंग कार्यालयाकडून देण्यात आली होती. मात्र त्यानंतर वेकोलिने आपल्या खान परिसराचा विस्तार करत पोवनी, साखरी येथेही खाणींच्या विस्तार केला. या परिसरातून वाहणारे नाले कोणतीही परवानगी न घेता, साधी ग्राम पंचायतीची सुद्धा परवानगी न घेता नाल्याना जोडल्याने यावेळेस पूराने शेकडो एकर शेती व घरे पाण्याखाली आली असा आरोप बबनभाऊ उरकुडे यांनी लावला.
या चार मागण्या मंजूर न झाल्यास जनआंदोलन
बबनभाऊ उरकुडे यांनी पाण्याखाली आलेल्या जमिनीला वेकोलिकडून २० हजार रुपये प्रति एकर भरपाई, २० हजार रुपये प्रति घर भरपाई, विना परवानगी जोडण्यात आलेल्या नाल्याना पूर्ववत करून वेकोलि क्षेत्रातून नेणे व लवकरात लवकर सेक्शन ४ लावून सर्व जमिनी अधिग्रहित करण्याची मागणी केली. अन्यथा लवकरच जनआंदोलन घेत पोवनी खदान परिसरात सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला. महाप्रबंधक कार्यालयात झालेल्या बैठकीत वेकोलि अधिकाऱ्यांसह शिवसेना राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे, ग्रापं सदस्य चेतन बोबाटे, माजी सरपंच विठ्ठल पाचभाई, शेतकरी प्रभाकर बोढे, शंकर बोढे, हरिश्चंद्र जुनघरी, अरुण पाचभाई, आकाश नांदेकर, संदीप देवाळकर, रामदास पाचभाई, सचिन पाचभाई,  संतोष पाचभाई, उमेश पाचभाई उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top