- बिबी ग्राम पंचायतचा अभिनव कार्यक्रम
गडचांदूर -
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्या देशातील जनतेशी संवाद साधण्याकरिता रेडिओ आणि सोशल मीडिया द्वारे प्रसारित होणारा 'मन की बात' ह्या कार्यक्रमाने भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. या कार्यक्रमाची प्रसिद्धी बघता कोरपना तालुक्यातील 'स्मार्ट वीलेज' म्हणून विख्यात बिबी ग्राम पंचायत ने पण आपल्या गावातील लोकांशी संवाद साधण्यासाठी 'ग्राम की बात' हा कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे.
आजपासून (२५ जुलै) बिबी ग्रामपंचायतचा कार्यकाल संपणार आहे. ह्या निमित्ताने मावळत्या ग्राम पंचायत ने गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आज सायंकाळी ८.०० वाजता 'ग्राम की बात' हा अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे. बिबी ग्राम पंचायत चे उपसरपंच आशिष देरकर यांच्या कल्पनेने ह्या नवीन कार्यक्रमाची चर्चा बरीच रंगली आहे. आता बिबीच्या सर्व नागरिकांचे लक्ष आज सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमाकडे वेधले गेले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.