Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वीज कोसळल्याने 21 जनावरांचा जागीच मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अमलनाला जवळील ग्राम मनोली ची घटना पाण्यातून आतापर्यंत एकूण 21 जनावरे काढण्यात आली अंदाजे 8 ते 10 लाखांचे झाले नुकसान पशुपालकांना तातडीने नुक...

  • अमलनाला जवळील ग्राम मनोली ची घटना
  • पाण्यातून आतापर्यंत एकूण 21 जनावरे काढण्यात आली
  • अंदाजे 8 ते 10 लाखांचे झाले नुकसान
  • पशुपालकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची वामन तुराणकर यांनी केली मागणी

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
अमलनाला जवळील ग्राम मानोली येथील पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वीज पडल्यामुळे 21 जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 7 जुलै च्या दुपारी 3.30 वाजता च्या सुमारास घडली. 
अमलनाला बांधच्या मागे लागून असलेल्या मानोली येथील शेतकऱ्यांची जवळपास 70 ते 80 जनावरे अमलनाला लगतच्या परिसरात चारा चरण्यासाठी आल्या होत्या. दुपारी 3.30 वाजता च्या सुमारास जनावरे तलावाकाठी पाणी पेत असताना अचानक पाण्यात वीज कोसळली. त्यामुळे पाणी पीत असलेल्या 21 जनावरांचा जागीच पाण्यात पडल्यामुळे बुडून मृत्यु झाला. त्यात सर्वाधिक गायी होत्या. घटनेची मिळताच शेतातील जवळ असलेले शेतकरी आणि गावातील लोकं जमा झाले. त्यांच्या सहायाने मृत झालेल्या गायींना बाहेर काढण्यात आले. माहिती मिळताच तेथील तलाठी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. एकूण 21 जनावरे पाण्यातून बाहेर काढण्यात आली होती. मानकु कुळमेथे यांचा एक गोरा, जंगू कुळमेथे यांचा एक गोरा, नानाजी उदे यांची एक गाय, जंगू उदे यांची एक गाय, बालाजी बोढे यांची दोन गाय, भाऊराव उदे यांची एक गाय, अमोल खरवडे यांची एक गाय,  साधू कोंडेकर यांची एक गाय, मारू मेश्राम यांची एक गाय, मधुकर वाडगुरे यांची एक गाय, श्रावण निकोडे यांचा एक गोरा, अमर मोहुर्ले यांची एक गाय एक गोरा, प्रकाश चटप यांची एक गाय एक गोरा, संतोष वसाके यांचा एक गोरा, नीलकंठ आत्राम यांची एक गाय, विजय कोडापे यांची एक गाय, वसंता गुरुनुले यांचा एक गोरा, नत्थू निकोडे यांचा एक गोरा मृत पावले. शासनाने मृत झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी वामन तुराणकर, मानोली येथील रहिवासी आणि जिल्हा परिषद सदस्य नानाजी आडे आणि गावातील लोकांनी प्रशासनाला व जिप पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी केली आहे.

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top