Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राजुरा शहरातील आठवडी बाजार वार्ड, जुनी अमराई भागातील इंदिरा शाळेच्या मागील जागेवर बगीचा, स...

विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा शहरातील आठवडी बाजार वार्ड, जुनी अमराई भागातील इंदिरा शाळेच्या मागील जागेवर बगीचा, स्टेज, वाकिंग ट्रॅक, सिमेंट रस्ता, वेरींग कॉट इत्यादी बांधकामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष अरूण धोटे यांच्या हस्ते आणि परिसरातील प्रमुख नागरिकाच्या उपस्थितीत संपन्न झाले. या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले आणि शहर विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकांच्या सहकार्याने आपण राजुरा शहरातील विविध विकास कामे पूर्ण करु शकलो आहोत आणि शहर विकासासाठी या पुढेही सातत्याने पाठपुरावा करीत राहू अशी ग्वाही दिली. 

याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, राजुभाऊ खोब्रागडे, नितीन जयपुरकर, वांढरे साहेब, वरगंटीवारजी, इटणकरजी, राकेश नामेवर, भोयरजी, प्रा. उरकुडे, बोढे सर, शेख इक्बाल, श्रीरंग ढोबळे, सुरेश ऐटलावर, रमेश जी, दीपक गुरनुले, महादेव अत्राम, प्रशांत नामेवार यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.

बातम्या अधिक आहेत....

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top