Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: त्या सहा कामगारांना आठ दिवसाच्या आत मध्ये कामावर न घेतल्यास.......
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुरज ठाकरे यांचा कंपनी प्रशासनाला कडकडीत इशारा धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - सन २०१९ मध्ये ए.सी.बी. इंडिया लिमिटेड पां...
  • सुरज ठाकरे यांचा कंपनी प्रशासनाला कडकडीत इशारा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
सन २०१९ मध्ये ए.सी.बी. इंडिया लिमिटेड पांढरपोवनी (आर्यन कोल वॉशरिज) कंपनीने अंदाजन ३७ ते ४० कामगार कामावरून कमी केले होते. कमी केलेल्या कामगारांना परत कामावर सामावून घेण्याबाबत कंपनीने आश्वासन दिले होते. परंतु कंपनीने ६ कामगारांना जाणीवपूर्वक कामावर न घेता बाकी काढलेल्या सर्व कामगारांना परत कामावर सामावून घेऊन बाकी ६ कामगारांवर अन्याय केला. अखेर ६ कामगार आपल्या न्याय व हक्कासाठी दारोदार भटकून निराश झाल्यानंतर युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्याकडे न्याय मागण्यास आल्या नंतर सूरज ठाकरे यांनी कामगारांवर होत असलेल्या पिळवणूकी कडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून तथा दि. १४ जुलै २१ ला आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी भेटून त्यांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले व कंपनी प्रशासनाशी चर्चा करून या ६ कामगारांना परत कामावर घेण्यास सांगितले. सदर कामगार स्थानिक असून आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागृत असल्याने  कंपनी जाणीवपूर्वक कामगारांना कामावर घेत घेत नव्हती. याच कंपनीमध्ये जय भवानी कामगार संघटनेची सण २००९ मध्ये संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांची कामगार संघटना होती. त्यावेळी येथील सर्व कामगारांना ठाकरे यांनी आवाहन दिले होते की कामगारांवर कंपनी प्रशासनाकडून झालेला कुठलाही अन्याय जय भवानी कामगार संघटना खपवून घेणार नाही. म्हणून आज सुरज ठाकरे यांनी कंपनी प्रशासनाला निवेदनाद्वारे या ६ कामगारांना येत्या आठ दिवसाच्या आत कामावर न घेतल्यास परिणाम वाईट होतील असा इशारा दिला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top