Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लोकप्रतिनिधी साहेब तुम्ही या रस्त्यावरून येऊ नका नाहीतर खड्यात पडणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तुमचे पांढरे शुभ्र कडक इस्त्री केलेले कपडे चिखलाने माखणार ग्रामीण परिसरातील जनतेचा लोकप्रतिनिधीना टोला ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था....
  • तुमचे पांढरे शुभ्र कडक इस्त्री केलेले कपडे चिखलाने माखणार
  • ग्रामीण परिसरातील जनतेचा लोकप्रतिनिधीना टोला
  • ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था....

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोना महामारीच्या संकटामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसह नियोजित कामे संथ गतीने सुरु आहे. दळणवळणासाठी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्याकडे प्राधान्याने लक्ष देऊन ते ठिकठाक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या पठाणपुरा ते मारडा रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावरील खडी, डांबर उखडून रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन कमालीची कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने लहान मोठे अपघाताचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. 
पावसाला सुरुवात झाली असून पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने नेमका खड्डा खोल किती याच्या अंदाज येत नसल्याने दररोज दुचाकीस्वार पडत असून त्यांना गंभीर दुखापत होत असल्याची माहिती सुद्धा सूत्राने दिली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता लोकप्रतिनिधींकडे वारंवार सांगून आणि निवेदने देऊनही या भागातील समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. "लोकप्रतिनिधी साहेब तुम्ही या रस्त्यावरून येऊ नका नाहीतर खड्यात पडणार, तुमचे पांढरे शुभ्र कडक इस्त्री केलेले कपडे चिखलाने माखणार" असा टोलाही ग्रामीण परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना लगावला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय व्यवस्थेने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुझवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top