Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अबब शेतकऱ्याच्या घरचे बिल दहा हजार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वीज बिल वसुली करण्याकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला दमदाटी विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - महावितरण कंपनीने एका शेत...
  • वीज बिल वसुली करण्याकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला दमदाटी

विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
महावितरण कंपनीने एका शेतकऱ्याला दहा हजाराचे बिल पाठवून विजेचा शॉक दिलाय. हातात बिल येताच बिलाची रक्कम पाहून करंट लागलेल्या शेतकऱ्याला दुसरा झटका तेव्हा लागला जेव्हा वीज बिल वसुली करण्याकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांने शेतकऱ्याला दमदाटी करत बिल भरण्याची मागणी केली. शेतकऱ्याला जास्तीचे बिल पाठविल्याने एकदा पुन्हा महावितरणचा भोंगळ कारभार उघड झाला आहे असा आरोप आम आदमी पार्टी चंद्रपुर शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद वांढरे यांनी लावला आहे. 
राजुरा तालुक्यातील टेंबुरवाही येथील शेतकरी बापुजी उद्धव बोबडे (उद्धव बोंदे) यांच्या घरगुती वापर असलेल्या विद्युत मिटरचे जुन 2021 एक महिन्याचे बिल रुपये 10000/- (दहा हजार रुपये) आले. जुन 2021 एक महिन्याचे वापरलेली रीडिंग 781 दाखविली असून शेतकऱ्याच्या घरी वापरत असलेले पंखे 2, एलईडी बल्ब 3, फ्रिज 1 सुरू आहे. बिल पाहताच शेतकऱ्याला झटका लागला. या जास्त बिलाला दाद मागायची तरी कुठे, या विवंचनेत असतांनाच लागोपाठ तीन दिवस पावसाने जोरदार हजेरी दिली, एकीकडे संसार, शेतीची कामे यात बिल भरण्याची शेवटची तारीख गेल्यावर बिलाची वसुली करण्याकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांनी दमदाटी करण्याचा आरोपही शेतकऱ्याने लावला आहे. वाढीव बिल येत असल्याने बिल कसे भरणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर पडलाय. नेमके बिल कशामुळे अधिक आले याची चौकशी करुन शेतकरी शेतमजुर विजग्राहकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टी शेतकरी आघाडी कडून करण्यात आली आहे. 







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top