Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लोंढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कायम वैद्यकीय अधिकारी देण्याची सामाजिक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी धनराज कोहळे - आमचा विदर्भ प्रतिनिधी सावली - लोंढोली हे गाव ...
  • कायम वैद्यकीय अधिकारी देण्याची सामाजिक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी
धनराज कोहळे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
सावली -
लोंढोली हे गाव सावली तालुक्यापासुन 15 किलोमीटर अंतरावर आहे. लोंढोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 8 ते 9 खेडेगाव येतात. या खेडेगावातील वयोवृद्ध ते लहान मुलांपर्यंत सगळेच उपचाराकरिता येत असतात. तालुक्यातील आरोग्य केंद्र हे खूप लांब असल्यामुळे सगळेच या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता येतात. यामध्ये गरोदर मातांचा सुध्या समावेश असतो. परंतु सध्यपरिस्थितीमध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने उपचार घेण्यासाठी रूग्णांना तालुकाच्या ठिकाणी ये जा करावे लागते. यासाठी रूग्णांना नाहक त्रास होत आहे. लोंढोली हे मुख्य मार्गावरचे ठिकाण असुन  येथे बँक, हायस्कूल आहे. लोंढोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सिर्सी, सिर्सी हेटी, पेडगाव, साखरी लोंढोली, हंराबा, उमरी, कढोली, डोनाळा हि गावे येतात. मात्र काही दिवसापासुन सर्व रुग्णांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत असतात. लहानसहान बिमारीसाठी सुध्या तालुक्याच्या ठिकाणी रुग्णांना जाई लागत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढोली येथे लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करावी. जेणेकरून रुग्णांची होणारी पायपीट तसेच त्यांना वेळेवर उपचार मिळण्याकरिता मदत होईल. तसेच त्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळेल. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.









Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top