Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धिडशी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पास्को अंतर्गत गुन्हा दाखल - आरोपीला अटक विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील धिडशी या गावी दुपारी घरी कुणी ...
  • पास्को अंतर्गत गुन्हा दाखल - आरोपीला अटक
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील धिडशी या गावी दुपारी घरी कुणी नसल्याची वेळ साधून गावातील एका युवकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र या धाडशी मुलीने जोरदार प्रतिकार केल्याने आणि मोठ्याने ओरडल्याने शेजारील लोक धावून आले. या घटनेत ही मुलगी जखमी झाली आहे. पळून गेलेल्या सचिन रामचंद्र माणूसमारे, वय 29 या आरोपीला राजुरा पोलिसांनी शेजारच्या गावातून अटक केली असून त्याचे विरुद्ध कलम 354, पास्को या कलमानुसार गुन्हा नोंदवून अटक केली आहे. 
दिनांक 25 जुलै ला धिडशी या गावातील बहुतांश शेतकरी पुरुष व महिला शेतावर गेल्या होत्या. यावेळी गावात सामसूम असल्याचे पाहून दुपारी दोन वाजता येथील सचिन रामचंद्र माणूसमारे, वय 29 हा युवक एका घरी गेला आणि अल्पवयीन मुलगी एकटीच असल्याचे बघून तिच्या घरात जाऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या अल्पवयीन मुलीने जोरदार प्रतिकार करीत मोठ्याने आरडाओरडा केला. आवाज ऐकून शेजारचे लोक धावून आले आणि त्यांनी या मुलीला सोडविले. या घटनेत आरोपीने मुलीचा गळा दाबल्याने व मारहाण केल्याने ही अल्पवयीन मुलगी जखमी झाली. 
प्रकरणाची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी आरोपीला पळून जातांना शेजारच्या गावातून अटक केली. या गुन्ह्यात आरोपी सचिन रामचंद्र माणूसमारे विरुद्ध विनयभंग व पास्को अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. राजुरा पोलीस अधिक तपास करीत आहेत. यापुर्वी या आरोपीने नांदा येथे जावून एका महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे कुटुंब असून त्यांना हद्दपार करावे, अशी संतप्त गावकऱ्यांची मागणी आहे.







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top