Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी  विरुर स्टेशन -  राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे आज सांयकाळ चार च्या सुमारास 28 वर्षीय विवाहितेन...
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
विरुर स्टेशन - 
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे आज सांयकाळ चार च्या सुमारास 28 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली.  
मंगला हनमंतु मडावी असे विवाहितीचे नांव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील हनमंतु मडावी हा मागील तीन वर्षांपासून शेतमजूर म्हणून विरुर येथे काम करीत आहे व एका घरी किरायाने आपल्या परिवारासह वास्तव करीत असताना आज अचानक मंगला हिने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती विरुर पोलीस स्टेशन ला कळताच विरुर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले असता मृतकीने लिहलेली एक चिट्ठी आढळली यात स्वतःच्या आजारामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याचे उल्लेख सामोर येत आहे. विरुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु ची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top