राजुरा -
राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, युवासेना जिल्हा प्रमुख इंजि. निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख राजू डोहे यांच्या नेतृत्वात स्थानिक राम मंदिर येथे जगदंब डायग्नो पॉईंट यांच्या सहयोगाने मोफत रक्त चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोफत रक्त चाचणी शिबिरात शेकडो नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती सरिताताई नीलकंठ कुडे, जिवन बुटले, माजी पंस सदस्य व शिवसेना विधानसभा संघटक नरसिंग मादर, माजी नगर परिषद उपाध्यक्ष बंडू वनकर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना शहर प्रमुख निलेश गांपावर, शहर समन्वयक सुनील लेखरजनी, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, उपतालुका प्रमुख सुधाकर मोरे, महिला आघाडी वर्षा पंदीलवार, सुनीता जमदाडे, युवती सेनेची साक्षी माथनकर, युवासेना माजी उपजिल्हाप्रमुख राकेश चिलकुलवर, तालुका चिटणीस (संघटक) कुणाल कुडे, तालुका चिटणीस वतन मादर, शहर प्रमुख पंकज बुटले, शहर चिटणीस स्वप्नील मोहूर्ले, उपतालुका प्रमुख प्रवीण पेटकर, शिवसेना विभाग प्रमुख तुषार मोरे, शिवसैनिक गणेश चन्ने, विठ्ठल नरड, दिलीप बुटले, युवासैनिक कुषाल सूर्यवंशी, अतुल खनके, गणेश चोथले, अजय सिंग, सुनील गोरकर, समीर शेख, गौरव चन्ने, अंकुश बुटले, निखिल गिरी, तनय वासाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिवसेना तथा युवासेने च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.