- गडचांदुरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या हस्ते उ्दघाटन
- गरिबांना फक्त 5 रुपयात पोटाची भूक भागवता येणार
गडचांदूर -
महाविकास आघाडी शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेली 'शिवभोजन थाळी' केंद्राचा नुकताच गडचांदुरात शुभारंभ झाला. कोरोना व सद्या बिकट परिस्थितीत अभाव ग्रस्त नागरिकांच्या पोटात दोन घास सहज उपलब्ध व्हावे करीता महाराष्ट्र शासनाद्वारा शिवभोजन थाळी सुविधा नाममात्र दरात उपलब्ध करून दिली आहे. गोरगरीब जनतेला माफक दरावर अर्थात फक्त 5 रुपयात पोटाची भूक भागवता यावी, या उदात्त हेतूने शासनाने सदर उपक्रम सुरू केला. कोरपना या आदिवासी बहुल तालुक्यात प्रथमच गडचांदूर या औद्योगिक नगरीत अलीकडेच शिवभोजन थाली केंद्राचे उदघाटन गडचांदुरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या हस्ते पार पडले.
नगर परिषदेच्या जवळ असलेल्या मेहेर भोजनालय अंतर्गत ही योजना सुरू केल्याचे केंद्राचे संचालक बबलू बनकर यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक पापय्या पोन्नमवार, गणेश गादीगोणीवार, सुनील तायडे सर, संगीता बनकर मॅडम, केंद्राचे संचालक बबलू बनकर आदी उपस्थित होते. गडचांदुर परिसरातील गोरगरिब नागरिकांनी या योजनेचा भरपूर लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सविता टेकाम यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.