Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा तालुक्यातील वर्धा नदीत सापडला युवकाचा मृतदेह
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेशन - दिनांक 17.07.2021 रोजी रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा नांदगाव पोडे येथी...
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
दिनांक 17.07.2021 रोजी रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा नांदगाव पोडे येथील विशाल रामदास महकुडकर वय 29 या युवकाने आत्महत्या केल्याची घटना सामोर आली आहे.
नांदगाव पोडे येथील विशाल रामदास महाकुडकर यांचे नावे पोलिस स्टेशन रामनगर येथे मिसिंग ची रिपोर्ट देण्यात आली होती. रामनगर पोस्टे च्या माहिती नुसार सदर इसम दि. 16.07.2021 चे सायंकाळी MH-34 PG-8118 या क्रमांकाची दुचाकी वाहनाने नातेवाईकांना भेट देण्याकरिता बाहेर पडल्याचे सचिन सुरेश मदपाते वय 31 यांच्या बयाना वरून माहिती मिडाली. पोलीस विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील हद्दित येणाऱ्या प्रत्येक पोलीस स्टेशन ला ही मिसिंग ची घटना कळविण्यात आली. प्रत्येककडे शोध सुरु असतांना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन लगताच्या धानोरा गावाजवळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम शोध मोहीम राबवित असतांना वर्धा नदीच्या पुलाजवळ सायंकाळच्या सुमारास मृत्यूदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती एनडीआर टीमने विरूर पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच विरूर पोलिसांनी तात्काळ घटनेस्थळी पोहचून पंचनामा केला. तपासादरम्यान सदर मृत्यूदेह चंद्रपूर  लगतच्या नांदगाव पोडे येथील असून मृतकाचे नांव विशाल रामदास माहकुलकर वय 29 वर्ष असे तपासा दरम्यान समोर आले. तेव्हा मृताकाच्या कुटुंबियांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. 
सदर मृत्यूदेह हे अतिशय सडलेल्या अवस्थेत असल्याने वैद्यकीय तपासणी करिता डॉक्टरांना घटनास्थळी पाचारण करुन शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास विरुर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक कृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक सदानंद वडतकर, पोहवा दिवाकर पवार, अशोक मडावी, रामदास निलेकर हे करीत आहे.

बातम्या अधिक आहेत.....

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top