Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दोन दुचाकी वाहनांची अमोर-समोर जबर धडक 1 मृत, 2 गंभीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदगाव (सूर्याचा) गावाजवळ दोन दुचाकी आमोरासमोर धडकल्या धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राजुरा कवठाला रोडवर नांदगाव जवळ मं...
नांदगाव (सूर्याचा) गावाजवळ दोन दुचाकी आमोरासमोर धडकल्या
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा कवठाला रोडवर नांदगाव जवळ मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास दोन दुचाकी वाहनांची अमोर-समोर जबर धडक झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू तर दोन जन गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार नांदा फाटा निवासी प्रफुल जमदाडे वय 28 गाडी नं MH-34 VA-7516 ने चंद्रपूर वरून परत येत असताना नांदगाव (सूर्याचा) गावाजवळ पांढरकवडा येथून एक कार्यक्रम आटोपून दुचाकीने गावाकडे परत येत असलेल्या धिडशी निवासी महादेव कौरासे वय 53 आणि त्यांच्या पत्नी मंगला महादेव कौरसे वय 48 यांच्या दुचाकीची नं MH-34 Y-6533 जोरदार धडक झाल्याने तिघे ही खाली पडून गंभीर रित्या जखमी झाले. महादेव कौरासे यांना डोक्यावर आणि तोंडावर गंभीर मार लागल्याने पूर्ण रक्तबंबाळ झाले होते. प्रफुल जमदाडे यांना ही डोळ्या जवळ आणि हातावर मार लागला असून त्यांना चंद्रपूरला हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी महादेव कौरासे आणि त्यांच्या पत्नीला राजुरा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात केले असता महादेव कौरासे ला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top