Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: २५ लक्ष रुपयाचे बगड खिडकी येथे बनणार सामाजिक सभागृह
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमीपूजन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - बगड खिडकी येथील समाज भवनासाठी २५ लक्ष रु. मंजूर करण्या...
  • आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमीपूजन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
बगड खिडकी येथील समाज भवनासाठी २५ लक्ष रु. मंजूर करण्यात आलेले असून या कामाचे भूमीपुजन नुकतेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी  नाहीद हुसेन, हिफाजुल रहमान(बाबाभाई), जाकीर कुरेशी, अमजद शेख, रमजान सर, शफी शेख, ताजू भाई, साकिब भाई(बंटी), राशीद हुसेन, सलीम शेख इमरान शेख, आदींची उपस्थिती होती.
बगड खिडकी येथे सामाजिक सभागृह बांधण्यात यावे. अशी येथील नागरिकांची मागील कित्येक वर्षापासूनची मागणी होती. याबाबत नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कडे निवेदन दिलेले होते. या मागणीची दखल घेत आमदार निधीतील २५ लक्ष रु. सदर सभागृहासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मंजूर केले आहे. या कामाचे भूमीपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते काल रवीवारी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. काही महिन्यातच येथे सुसज्ज सभागृह उभे राहणार असून या सभागृहातून समाज प्रबोधनाचे कार्य घडावे, समाजातील नागरिकांसाठी हे सभागृह हे एक व्यासपीठ ठरावे असे प्रदिपादन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले तसेच नागरिकांची जुनी मागणी पूर्ण करता आली याबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात यंग चांदा ब्रिगेड चे कार्यकर्तेसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

लालपेठ कॉलरी येथील १० लक्ष रुपयाच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे  आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमीपूजन
चंद्रपूर शहरातील लालपेठ कॉलरी येथील दुर्गामाता मंदिर परिसरात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लक्ष रु. संरक्षण भिंतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. याच विकास कामाचे चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते रविवार दिनांक १८ जुलै रोजी भ

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top