- नांदेडमध्ये टोळीयुद्धाचा जोरदार भडका
- जामिनावर सुटलेल्या गुंडाचा खून
नांदेड -
नांदेडशहरात गँगवार संपता संपत नसून काल रात्री गाडीपुरा भागात अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून व तलावरीचे वार करून एका गुंडाचा निर्घृण खून केला. विक्की ठाकूर असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे. टोळीयुद्धातून हा खून झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र, भर रस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळं नांदेड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विक्की ठाकूर हा जामिनावर नुकताच जामिनावर सुटला होता. काल साडेसात वाजण्याच्या सुमारास गाडीपुरा भागात रेणुका माता मंदिराच्या पूर्वेकडे असलेल्या एका गल्लीतून आत जाणाऱ्या रस्त्यावर तो स्वत:च्या घराजवळ उभा होता. तेव्हा दुचाकी गाड्यांवर आलेल्या सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यांच्या गोळ्या झाडण्यात आल्या. पहिली गोळी चुकल्यानंतर तो जीव वाचवण्यासाठी धावू लागला. मात्र दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग करत पुन्हा गोळ्या झाडल्या. त्यातली एक गोळी विक्कीच्या डोक्यात लागली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. विक्की पडल्याचे पाहून इतर काही जणांनी त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
वर्षभरापूर्वी विक्की चव्हाण नामक एका गुंडाचा असा खून झाला होता. विक्की ठाकूर हा त्याचाच साथीदार होता. कैलास बिगानिया टोळीशी त्यांचे वैर होते. याच बिगानिया टोळीने विक्की चव्हाण याचा खून केला होता. विक्की ठाकूरच्या खुनामागे देखील बिगानियाचा हात असावा, असा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
बातम्या अधिक आहेत......
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.