- ४५ वर्षावरील नागरिकांना वेगळे लसीकरण केंद्र देण्याची मागणी
गडचांदूर -
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होताच दोन दिवसांपासून तरुणांची लस घेण्यासाठी केद्रांवर गर्दी उसळली आहे. सकाळपासूनच केद्रांवर रांगाच रांगा लागत आहेत.
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत नांदा येथे आज लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. सांस्कृतिक भवन नांदा फाटा येथे सकाळी ९.३० वाजता लसीकरणाला सुरू झाली. मात्र लसीकरणासाठी उपलब्ध केलेल्या डोस ची संख्या बघता सकाळी ९.०० वाजताच्या आधीच मोठ्या संख्येत नागरिकांची लांब लचक रांग लागली होती. आरोग्य विभागाने नांदा येथे लसीकरणाला २०० डोस उपलब्ध केले होते. सकाळी ९ वाजेपर्यंतच जवळपास २०० ते २५० नागरीक लस घेण्याकरीता रांगेत लागलेले दिसत होते. त्यामुळे गर्दी बघून अनेक नागरिक लसीकरण सुरू होण्याआधीच परत जातांना दिसले.
१८ वर्षाच्या वरील सर्वांना पाहिले आणि दुसऱ्या डोस दिल्या जात आहे. त्यामुळे ४५ च्या वरील नागरिकांना मोठ्या रांगेत उभे राहून लस घेणे जरा कठीणच झाले आहे. फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वेगळया दिवशी किंव्हा वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही होत आहे. नांदा येथील लोकसंख्येचा विचार करुन आरोग्य विभागाने लसीच्या कमीत कमी ५०० डोजेस उपलब्ध करायला पाहीजे अशी मागणी येथील ग्राम पंचायतचे काँग्रेस सदस्य अभय मुनोत यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.
बातम्या अधिक आहेत.....
तळीरामांनी केली दारूसाठी तोबा गर्दी 🍺 6 वर्षानंतर पुन्हा एकदा दारू विक्रीला प्रारंभ
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.