Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चिंचाळा येथे नालीचे निकृष्ट बांधकाम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकाम व्यवस्थित करण्याची उलगुलान संघटनेची मागणी सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी सावली - मूळ तालुक्य...

  • बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकाम व्यवस्थित करण्याची उलगुलान संघटनेची मागणी
सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
सावली -
मूळ तालुक्यातील मौजा चिचाळा येथे ग्रामपंचायत अंतर्गत नाली बांधकाम सुरु आहे. सदर नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार उलगुलान संघटनेनी केली आहे. नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून शासन व प्रशासनाची दिशाभूल करून सदर बांधकाम होत असल्याचा आरोपही उलगुलान संघटनेने लावला आहे. यासंदर्भात उलगुलान संघटनेचे मुल तालुकाध्यक्ष रोहित बोबाटे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले. निवेदनात सदर नाली बांधकामाचे कार्य तातडीने थांबवून सदर कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहित बोबाटे, उपाध्यक्ष किशोर पगडपल्लिवार, देवाजी ध्यानबोईवार, शुभम निमगडे, सुरज टिकले तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top