- कोरोना नियमांचे पालन करण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी केले आवाहन
राजुरा -
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ अतिशय मर्यादित स्वरुपात करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही जिल्ह्यात धूमधडाक्यात लग्न पार पडत असल्याचे चित्र दिसत आहे. याविरोधात आज नगर पालिकेच्या व पोलीस विभागाच्या पथकाने शहरातील एका मंगल कार्यालयावर दंड ठोठावला.
मध्यन्तरी कोरोनाच्या जीवघेण्या लाटेमध्ये अनेक लोकांचे बळी गेले व आताही जीव जात असताना शासन निर्णयाचे काटेकोर पालन करीत धूमधडाक्यात विवाह समारंभ टाळणे अपेक्षित होते. मात्र शासन निर्णय पायदळी तुडवत धूमधडाक्यात विवाह करणं सध्या राजुरा शहराप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र धुमधडाक्यात लग्न सोहळे संपन्न होताना दिसत आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर यांचे सुधारित आदेश नुसार चंद्रपूर जिल्हा स्तर ३ तरतुदी अन्वये शहरातील मंगल कार्यालय व्यवस्थपकाना कोविड १९ नियमांचे सूचना व नोटीस देऊन व संपूर्ण शहरात दररोज स्पिकरने दवंडी फिरवून सुद्धा लग्नाची रीतसर परवानगी देताना कडक निर्बंध टाकून ही आज दि. १ जुलै ला येथील एका मंगल कार्यालयात संपन्न होत असलेल्या लग्नसमारंभात कोरोना चे नियम बाजूला ठेवून मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती होती. याची सूचना मिळताच नप मुख्याधिकारी अर्शिया जुही व त्यांचा चमूने नियमांची पायमल्ली करणाऱ्या मंगल कार्यालयाला ५ हजार व आयोजकाला १० हजाराचा दंड ठोठावला. कोरोनाचा प्रसार पुन्हा आपल्या परिसरात होऊ नये त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यापुढेही शासन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा नगर पालिका प्रशासनाने दिला.
या कार्यवाहीत पोलीस विभागाची टीम, नप प्रशासकीय अधिकारी विजय जांभूळकर, नोडल अधिकारी अक्षय सूर्यवंशी, लिपिक सतीश देशमुख, मनोज राजगडे, नुसरत अली ने सहभाग नोंदविला. जनतेने कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी केले आहे.
बातम्या अधिक आहेत....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.