Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लाटिपाडा धरण क्षेत्रात वृक्षारोपण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवस वृक्षारोपणाच्या साजरा चिन्मय देवरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी धुळे - खासदार संसदरत्न सुप्रियात...

  • खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवस वृक्षारोपणाच्या साजरा
चिन्मय देवरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
धुळे -
खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त लाटिपाडा धरणावर वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादासो. जयेश साळुंके व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस साक्री तालुका अध्यक्ष गितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण क्षेत्रात वृक्षारोपण केल्या गेले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे धुळे जिल्हा सोशल मीडिया समन्वयक आदेश साळुंके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका सरचिटणीस राहुल जिरे, प्रियांशु भदाणे, चिन्मय देवरे, अनिकेत नेरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या अधिक आहेत....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top