Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वसंतराव नाईक यांच्या १०८ व्या जयंती निमित्त रक्तदान व मोफत रक्त तपासणी शिबिर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पुरोगामी पत्रकार संघ व नागवंश युथ फोर्सचे आयोजन तालुका प्रतिनिधी - राजुरा - हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या १०८ वी जयंती तसेच पुरोगा...

  • पुरोगामी पत्रकार संघ व नागवंश युथ फोर्सचे आयोजन
तालुका प्रतिनिधी -
राजुरा -
हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या १०८ वी जयंती तसेच पुरोगामी पत्रकार संघ राजुराचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत यांच्या जन्मदिनाचे संयुक्तरित्या औचित्य साधून कृषी दिनानिमित्त आज रक्तदान व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांस्कृतिक सभागृह, साई नगर लेआऊट, शिवाजी वॉर्ड क्रं.९ राजुरा येथे सदर शिबिर पार पडले.

कोविड-१९ महामारीच्या काळात राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' या उक्तीप्रमाणे पुरोगामी पत्रकार संघ व नागवंश युथ फोर्स राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नव्याने रक्तदान करणाऱ्या तरुण युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी २२ रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. राज्य रक्त संक्रमण परिषद चंद्रपूरचे जय पचारे व चमूने मोलाचे सहकार्य केले. यावेळी राजुरा येथील हरहुन्नरी युवक महेंद्र सेपूरवार यांचे काल अपघाती निधन झाले. यावेळी त्यांना उपस्थितांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या शिबिरात रविकिरण बावणे, उत्कर्ष गायकवाड, धनराज उमरे, राहुल अंबादे, सतीश कांबळे, गौरव रामटेके, प्रतीक कावळे, संयोग साळवे, राहुल भागवतकर, तुषार पाझारे, आदर्श तेलंग, अनिकेत साळवे, हर्षल गाले, आकाश नळे, आकाश येगेवार, जय खोब्रागडे, जतीन इंमुलवार, विजय मोरे, अक्रम शेख, रुपेश मेश्राम आदीनी उपस्थित राहून सहकार्याची भूमिका बजावली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top