Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अंमलनाला पर्यटन स्थळ जिल्ह्याचे केंद्रबिंदू ठरणार - ना. विजय वडेट्टीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने अंमलनाला पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रति...

  • आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने अंमलनाला पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने अंमलनाला पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. निसर्गरम्य पहाडी भागातील अंमलनाला सिंचन प्रकल्प पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार असून हे पर्यटन स्थळ जिल्ह्याचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. अंमलनाला प्रकल्पाचे सौंदर्यीकरण, करमणूक केंद्र व पर्यटन विकास कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार बाळूभाऊ धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. काळे, उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर, राजुराचे तहसीलदार हरीश गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नामदार विजय वडेट्टीवार यांनी अंमलनाला पर्यटन विकासाच्या कामासाठी आवश्यकता भासल्यास आणखी तेवढाच निधी प्राप्त करून देणार असल्याचे यावेळी म्हटले. आमदार सुभाष धोटे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून एखादे काम मनात ठरवले की, निधी मंजुरीसाठी कसोशीने प्रयत्न केला जातो. माणिकगड किल्ल्याच्या सौंदर्यीकरण व संवर्धनासाठी सुद्धा आपण २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. पर्यटन क्षेत्राकडे विशेष लक्ष असल्याचे सुद्धा आमदार सुभाष धोटे यांनी बोलताना सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन आशिष देरकर यांनी केले. प्रास्ताविक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. काळे यांनी केले. तर आभार शाखा अधिकारी अमीर सय्यद यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता उपविभागीय अभियंता डी. एन. मदनकर, कंत्राटदार प्रतिनिधी रामन्ना रेड्डी, आर्किटेक शहरिष शेख, विक्रम येरणे, संतोष महाडोळे, शैलेश लोखंडे, प्रीतम सातपुते, आशिष वांढरे आदींनी सहकार्य केले.

तीन टप्प्यात होणार विकास
अंमलनाला पर्यटन स्थळाचा विकास तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत, कुंपण, रेस्टॉरंट, बगीचा, स्विमिंग पूल व झोपड्या तयार करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नौकायन,(बोटींग) मचाण, वॉटरपार्क, तयार करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात वेस्टवेअरचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top