Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ‘इथिअरीअल रेवरी’मधून अलौकिक भावविश्व; पंजाब राजभवनात सोहळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
साहित्य क्षेत्रात चंद्रपूरचा मान वाढविणाऱ्या डॉ. उज्वला झाडे यांचे यश आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ०६ मे २०२६) -         चंद्रपूरच्...
साहित्य क्षेत्रात चंद्रपूरचा मान वाढविणाऱ्या डॉ. उज्वला झाडे यांचे यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०६ मे २०२६) -
        चंद्रपूरच्या मूळ रहिवासी असलेल्या कवयित्री डॉ. उज्वला विजय झाडे यांच्या ‘इथिअरीअल रेवरी’ या इंग्रजी काव्यसंग्रहाचे भव्य प्रकाशन चंदीगड येथील पंजाब राजभवनात राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या हस्ते दिनांक २ मे रोजी पार पडले. या सोहळ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राला राष्ट्रीय पातळीवर विशेष ओळख मिळाली आहे. कार्यक्रमादरम्यान राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी डॉ. उज्वला झाडे यांच्या लेखनशैलीचे कौतुक करत त्यांच्या साहित्यिक कार्याची प्रशंसा केली. त्यांनी या काव्यसंग्रहातून व्यक्त झालेल्या भावविश्वाचे आणि कल्पनाशक्तीचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

        ‘इथिअरीअल रेवरी’ या शीर्षकाचा अर्थ ‘अलौकिक दिवास्वप्न’ असा असून या काव्यसंग्रहात निसर्गातील विविध छटा, मानवी मनातील सूक्ष्म भावना, स्नेहबंध आणि अंतर्मनातील संवेदनशील अनुभवांचे प्रभावी आणि सखोल चित्रण करण्यात आले आहे. हा डॉ. झाडे यांचा इंग्रजी भाषेतील पहिलाच काव्यसंग्रह असून त्यांच्या मराठी साहित्यकृती देखील लवकरच वाचकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

        सध्या चंदीगड येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. उज्वला झाडे यांनी पीएचडी, यूजीसी नेट, एमएससी आणि एमसीए अशी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे. त्या भारतीय प्रशासकीय सेवेत २००२ बॅचचे अधिकारी डॉ. विजय नामदेव झाडे यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या चंद्रपूर येथील वरिष्ठ विधिज्ञ ॲड. वासुदेव वासेकर व सौ. आशा वासेकर यांच्या कन्या आहेत.

        डॉ. उज्वला झाडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी आमदार ॲड. वामनराव चटप, वंदना चटप, डॉ. सुरेश मोहितकर, प्रा. ज्योत्स्ना मोहितकर, ॲड. दीपक चटप, प्रदीप देशमुख, अविनाश पोईनकर, मारोतराव बोथले तसेच झाडे कुटुंबीय, आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

#UjjwalaZade #EtherealReverie #Chandrapur #Rajura #MarathiNews #BookLaunch #PunjabRajBhavan #Chandigarh #PoetryBook #IndianAuthor #WomenAchievers #Literature #ProudMoment #IASFamily #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top