Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सोनोग्राफी सेवेसाठी राजुरा रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नेमण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ०६ मे २०२६) -         तालुक्यातील तसेच ग्रामीण व आदिवासी भा...
निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०६ मे २०२६) -
        तालुक्यातील तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले राजुरा उपजिल्हा रुग्णालय सध्या मूलभूत आरोग्य सेवांच्या कमतरतेचा सामना करत आहे. विशेषतः कायमस्वरूपी सोनोग्राफी तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर रुग्णांना तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्यातून आर्थिक व मानसिक ताण वाढत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन नगरसेवक भूपेश मेश्राम व उमेश गोरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कायमस्वरूपी सोनोग्राफी तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. शासनाच्या आरोग्य धोरणानुसार ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार सेवा मिळणे आवश्यक असताना अशी परिस्थिती निर्माण होणे चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

         रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने नागरिकांना चंद्रपूर किंवा इतर शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. यामुळे वेळ, पैसा आणि आरोग्य या तिन्ही बाबींवर परिणाम होत आहे. विशेषतः गर्भवती महिलांसाठी ही बाब धोकादायक ठरत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. निवेदन देताना प्रदीप मोरे, रवी आत्राम, विवेक राठोड, आकाश तोळसे, रवी वाढई, सागर नरेलवार, राजू कामटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सामान्य जनतेच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडवून राजुरा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी सोनोग्राफी तज्ज्ञ नेमण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

#Rajura #Chandrapur #HealthcareCrisis #PublicHealthIndia #SonographyDoctor #RuralHealthcare #MaharashtraNews #BJP #OBCMorcha #HealthForAll #HospitalIssues #RajuraNews #HealthcareDemand #MedicalFacilities #BreakingNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top