Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लक्ष्मी नृसिंह जयंतीनिमित्त भजन स्पर्धा; नव्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दत्त मंदिरात जयंती उत्सव; राजकीय व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती आमचा विदर्भ - अनंता गोखरे  बल्लारपूर (दि. ५ मे २०२६) -         बल्लारपूर शहर...
दत्त मंदिरात जयंती उत्सव; राजकीय व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
बल्लारपूर (दि. ५ मे २०२६) -
        बल्लारपूर शहरातील झाकीर हुसेन वॉर्ड येथे स्थित दत्त मंदिरात लक्ष्मी नृसिंह जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. जयंतीनिमित्त भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बल्लारपूर शहर तसेच ग्रामीण भागातील विविध भजन मंडळांनी सहभाग घेतला. सहभागी भजन गटांनी सादर केलेल्या भक्तीगीतांमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. बक्षीस वितरण व सत्कार समारंभासाठी माजी खासदार आणि कामगार नेते नरेश बाबू पुगलिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या भजन गटांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

        यानंतर नवनिर्वाचित नगर परिषद पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार आणि कामगार नेते नरेश बाबू पुगलिया यांच्या हस्ते नगर परिषद अध्यक्षा डॉ. अलका अनिल वाढई, माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, लखन सिंह चंदेल, माजी नगरसेविका रेणूका दूधे, नगरसेवक डॉ. सुनील कुलदीवार, सिक्की यादव, अब्दुल करीम शेख, मेघा भाले, मोना धानोरकर, सुनीता जीवतोडे यांचा शाल व नारळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रणय काकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्त मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक गुप्ता, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, सचिव मारुती मोंडे, सहसचिव शिवचंद द्विवेदी तसेच इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.

#BallarpurNews #LakshmiNrusimhaJayanti #DattMandir #BhajanCompetition #ReligiousEvent #NareshPugalia #AlkaWadhai #ChandrapurNews #MaharashtraEvents #BhaktiSangeet #नगरपरिषद #धार्मिककार्यक्रम #भजनस्पर्धा #BallarpurCity  #LocalNewsMarathi #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top