Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ट्रकच्या धडकेत महेंद्र शेपूरवार यांचे दुःखद निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
1 जुलै च्या रात्री खामोना जवळील दुर्घटना तालुका प्रतिनिधी - राजुरा - राजुरा शहरातील आझाद चौकातील महेंद्र शेपूरवार, वय 36 या युवकाला खामोना ग...

  • 1 जुलै च्या रात्री खामोना जवळील दुर्घटना
तालुका प्रतिनिधी -
राजुरा -
राजुरा शहरातील आझाद चौकातील महेंद्र शेपूरवार, वय 36 या युवकाला खामोना गावाजवळ एका ट्रक ने जोरदार धडक दिली. त्याला तातडीने राजुरा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर असल्याने तेथून चंद्रपूर रूग्णालयात नेताना त्यांचे निधन झाले. दिनांक 1 जुलै ला रात्री ही दुर्घटना घडली.

महेंद्र हे जिवती तालुक्यातील पीटीगुडा आश्रमशाळेत शिक्षक होते. आश्रमशाळेत नवीन विद्यार्थ्यांची भरती करण्यासाठी विद्यार्थी शोधायला ते सकाळी गेले होते. रात्री पीटीगुडा येथून दुचाकीने परत येत असतांना त्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. हा ट्रक चुकीच्या दिशेने भरधाव येत असल्याचे समजते. अपघात होताच त्यांच्या मागे येणार्‍या एका व्यक्तीने तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र त्यानंतर चंद्रपूरला नेताना रस्त्यातच ते गतप्राण झाले. आज दुपारी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेंद्र शेपूरवार हे राजुरा शहरात 'माही' या नावाने ओळखले जात होते. नेहमी हसतमुख व कुणाच्याही संकटात धावून जाणार्‍या या युवकाच्या जाण्याने येथे शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे.

टीम आमचा विदर्भ कडून भावपूर्ण श्रद्धांजली 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top