Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर रेडीमेड असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राकेश तहलानी अध्यक्ष तर चिराग नथवानी यांची सचिवपदी नियुक्ती शशी ठक्कर - आमचा विदर्भ पप्रतिनिधी चंद्रपूर - गंजवार्डातील जलाराम मंदिर मध्ये नु...

  • राकेश तहलानी अध्यक्ष तर चिराग नथवानी यांची सचिवपदी नियुक्ती
शशी ठक्कर - आमचा विदर्भ पप्रतिनिधी
चंद्रपूर -
गंजवार्डातील जलाराम मंदिर मध्ये नुकत्याच झालेल्या चंद्रपूर रेडीमेड असोसिएशनच्या आमसभेत कोरोना कालावधीत व्यावसायिकांना भेडसावत असलेल्या समस्या याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. सोबतच चंद्रपूर रेडीमेड अससोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी राकेश तहलानी, सचिवपदी चिराग नथवानी, कोषाध्यक्ष मनीष राजा, उपाध्यक्ष (गोलबाजार) अजय कोतपल्लीवार, उपाध्यक्ष (मेन रोड) नरेश मोटवानी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. 

प्रतिष्ठित व्यापारी दिनेश बजाज, दिनेश नथवानी, रवींद्र पुगलिया, किशोर पवार, देवेंद्र नारंग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नरेश रेबनकार, अभय मामीडवार, हितेश नगदिया, अभिषेक तोष्णीवाल, आनंद सांग्लानी, शशी ठक्कर इत्यादींसह मोठ्या संख्येत रेडीमेड असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. 

बातम्या अधिक आहेत.....


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top