Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कुठे आहे पत्रकार संरक्षण कायदा? पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्यू रिपोर्ट्स चंद्रपूर - चंद्रपुर शहरातील रघुवंशी कॉम्पेक्स गोळीबार प्रकरण घडले संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले ...
आमचा विदर्भ - ब्यू रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपुर शहरातील रघुवंशी कॉम्पेक्स गोळीबार प्रकरण घडले संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले परंतु, हे प्रकरण संपत नाही तोच पुन्हा गुंडागर्दी चे प्रकरण गजबजलेल्या वरोरा नाका चौकात घडले. गुरूवार दि. १४ जुलै ला भर दुपारी वरोरा नाका चौकात १०-१२ युवकांनी वरोरा नाका चौकातील एका पानठेला व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. युवकाला मारहाण होत असताना बरेच लोक जमा झाले परंतु सर्वानी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्या युवकाला सोडविण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. 
या मारहाणीची भनक वरोरा नाका चौकातील श्रमिक पत्रकार संघाचे कार्यालयात बसलेल्या पत्रकारांना लागली. काही पत्रकारांनी व्हिडीओ व फोटो काढण्याचा प्रयत्न करीत असताना. गुंड युवकांची नजर पत्रकार भवनाकडे पडली मग त्यांचा घोळका पत्रकाराकडे वळला व पत्रकार प्रकाश हांडे यांना ‘आमचा व्हिडीओ काढलास तर, कापून टाकू’ अशी धमकी देत हांडेंच्या हातातला मोबाईल हिसकविण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनीमध्यस्ती केली व लगेच रामनगर पोलिसांना फोन करण्यात आला. मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी यायला बराच विलंब लावला. युवकाला मारहाण केल्यावर सुद्धा 10 ते 15 मिनिट थांबुन ते सर्व युवक घटनास्थळावरून पसार झाले. पोलीस आले मात्र त्यांना कुणीही आरोपी युवक घटनास्थळी मिळाले नाही.
पत्रकार प्रकाश हांडे यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली. वृत्त लिहेपर्यंत कुणालाही अटककरण्यात आली नव्हती. शहरातील गुन्हेगारीवर आता पोलिसांनी कठोर पावले उचलून गुंडांची दादागिरी ठेचायला हवी नाहीतर चंद्रपूरचा गँग ऑफ वासेपुर व्हायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top