Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बांधकामातील निकृष्ट दर्जा उघड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नित्कृष्ट बांधकामामुळे एका वर्षातच नालीचे बांधकाम खचले मनपा आयुक्तांना निवेदन सादर  शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - पठणपुरा वार...
  • नित्कृष्ट बांधकामामुळे एका वर्षातच नालीचे बांधकाम खचले
  • मनपा आयुक्तांना निवेदन सादर 

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
पठणपुरा वार्ड येथील गुलाब देशमुख ते विजय चहारे, मनोज आंबेकर यांच्या घरा पर्यंत सिमेंट काँक्रीटच्या नालीचे बांधकाम मे 202० मध्ये करण्यात आले होते. त्या नालीला उतार नसल्यामुळे घाण पाणी नालीतच एक फुटा पर्यंत जमा राहत होते अशी तक्रार संबंधित इंजिनिअर ला देण्यात आली होती. एकही  पाऊस आला की सर्व घाण रस्त्यावर व अंगणात जमा होत आहे तसेच जून 21 च्या पहिल्या पावसातच नाली जवळपास 100 फुट (30 मीटर) कोसळली. त्यामुळे नालीचे घाण पाणी घराच्या मागील भागात, खुल्या प्लॉटवर जमा होत असून त्यामुळे मच्छरचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याव्यतिरिक्त घाणीमुळे डुकरांच्या राहण्याचे ठिकाण हि हे ठिकाण बनले आहे. सदर नाली बांधकाम कामाच्या बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्याव्यतिरिक्त दोषपूर्ण नालीचे बांधकाम तातडीने दुरुस्त करण्याची मागणीसुद्धा नागरिकांनी केली आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top