Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आसोला मेंढा तलावातील पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा - राकेश गोलेपल्लीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अपुऱ्या पावसामुळे रोवणी खोळंबली सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी सावली - मागील वर्षीप्रमाणे या वर्षी पावसाने दडी मारल्याने जीबगांव क्षे...
  • अपुऱ्या पावसामुळे रोवणी खोळंबली

सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
सावली -
मागील वर्षीप्रमाणे या वर्षी पावसाने दडी मारल्याने जीबगांव क्षेत्रात अनेक शेतकऱ्याची रोवणी खोळंबली असून काही शेतकऱ्यांचे परे मरण्याच्या तारणीस आले असून आसोला मेंढा नहरातील पाणी सोडून शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी जीबगांव येथील तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.
मागील आढवड्यात नियमित पाऊस आल्याने शेतकऱ्याने रोवणीस सुरुवात केली पण पावसाने दडी मारल्याने सिरसी,साखरी,लोंढोली,जांब बूज,केरोडा, रयतवारी,चक पेडगांव आदी गावातील रोवणी खोळंबली आहे.आज येणार-उद्या येणार पाऊस  या अपेक्षेने शेतकरी पावसाची वाट पाहू लागला पण त्याला निराशेच्या पलीकडे काहीच मिळत नाही, तर साखरी लोंढोली व हरांबा या गावात आसोला मेंढा येथील पाणी मिळत नसल्याने त्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागत आहे.करीता पाणी सोडुन शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलपल्लीवार यानी केले आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top