Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कुष्ठांतेयांनी सुरू केले स्वयंरोजगार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आर्थिक स्वावलंबन व स्वयंपूर्णतेकडे कुष्ठांतेयांची वाटचाल धनराज कोहळे - आमचा विदर्भ प्रतिनिधी सावली - प्रदीर्घ काळापासून समुदायातील असंख्य कु...
  • आर्थिक स्वावलंबन व स्वयंपूर्णतेकडे कुष्ठांतेयांची वाटचाल
धनराज कोहळे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
सावली -
प्रदीर्घ काळापासून समुदायातील असंख्य कुष्ठांतेयासोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दुर्व्यवहार होत आहे. त्यातून निर्माण होणारे प्रश्न व विविध समस्यां मुळे  कुष्ठांतेय व त्यांचे कुटुंबांतील सदस्यांना असंख्य यातना व आव्हानांचा सामना करीत हलाखीचे जीवन जगावे लागते असे चित्र सर्वत्र दिसते. मात्र याविपरीत परिस्थिती चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पाहायला मिळते आहे. काही कुष्ठांतेयांनी स्वतः स्वयंरोजगार सुरू केले आहे आणि आर्थिक स्वावलंबनाकडे कुष्ठांतेयांनी वाटचाल सुरू केली आहे. स्वतः सक्षम बनून स्वतःच्या समस्यांचे निराकरण करण्याचा कुष्ठांतेयांनी चांगल्याप्रकारे प्रयत्न करीत आहे. अशा सक्षम कुष्ठांतेयांनी एकत्र व संघटीत प्रयत्नातून समुदायातील कुष्ठांतेयांचे सक्षमीकरण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी  कुष्ठांतेयांनी अलर्ट इंडिया मुंबई च्या मार्गदर्शनाने सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था या  सामाजिक  संस्थेच्या वतीने गेल्या वर्षांपासून सासाकावा हेल्थ फाऊंडेशन, जापान च्या सहकार्याने २८ कुष्ठांतेयांना स्वयं रोजगार उभारण्याचे मार्गदर्शन व मदत केली  आहे. संस्थेने दिलेल्या आर्थिक सहयोगाने कुष्ठांतेयांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरू केले असून ते स्वतःचा आधार बनले आहे. या स्वयं रोजगारी/स्वयं उद्यमी कुष्ठांतेयांचा आदर्श आता इतर कुष्ठांतेय  घेऊ लागले आहे. याशिवाय स्वतःची काळजी ते चांगल्याप्रकारे घेत आहेत. अर्थात हे गेल्या काही वर्षात अवलंबण्यात आलेल्या मानवाधिकाराधिष्ठीत दृष्टीकोन बाळगून कुष्ठांतेयांचे सक्षमीकरण प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे शक्य झाले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top