राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा आर्वी ग्रामपंचायत येथे आज उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यात भास्कर डोंगे यांची आर्वी च्या उपसरपंचपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समिती राजुराचे विस्तार अधिकारी नेवारे यांनी काम पाहिले. सरपंच शालूताई विठ्ठल लांडे, ग्रा प सदस्य तानेबाई कोहपरे, बंडु आईलवार, मारोती महाकुलकर, सुभाष कालवले, वंदना मुसळे, उषा उपरे, ग्रामसेवक जयश्री चंदनखेडे आदी उपस्थित होते. निवडीबद्दल आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, आर्वी च्या सरपंच शालु लांडे तसेच सर्व सदस्य आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.