Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थानिक पक्षश्रेठींनी लक्ष न दिल्यास प्रकरण पेटण्याची शक्यता दारू पिऊन धिंगाणा घालत सिमेंट पोल तोडले ; पोलिसात गुन्हा दाखल काँग्रेस संस्कृती...

  • स्थानिक पक्षश्रेठींनी लक्ष न दिल्यास प्रकरण पेटण्याची शक्यता
  • दारू पिऊन धिंगाणा घालत सिमेंट पोल तोडले ; पोलिसात गुन्हा दाखल
  • काँग्रेस संस्कृतीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना - अनिल मुसळे
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
प्रभू श्री रामचंद्र महाविद्यालय नांदा येथील प्राचार्य अनिल मुसळे यांनी "स्मार्ट विलेज" म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या बीबी या ग्रामपंचायतचे सदस्य व त्यांच्या 4-5 साथीदारांनी दारू पिऊन धिंगाणा घालत त्यांच्या मालकीच्या जागेत असलेली तार कंपाउंड चे वीस ते पंचवीस सिमेंट पोल 1 जुलैच्या रात्री तोडण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० कलम ४२७, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला असून तपास सुरु आहे. 

नांदा फाटा पोलिस चौकीला लागून अनिल मुसळे यांच्या मालकीचे शेत मागील 14-15 वर्षापासून पडीत अवस्थेत आहे. तिथे त्यांना शेती करण्याच्या हेतूने तहसील कार्यालयाने दिलेल्या नकाशे प्रमाणे आपल्या जागेची तारबंदी केली होती. बिबी येथील ग्राम पंचायत सदस्याने या कामावर आक्षेप घेतला होता. मुसळे यांनी कुठलीही शासन परवानगी न घेता, शिव धुराची जागा न सोडता व कुठलीही शासकीय मोजणी न करता अतिक्रमण करुन संरक्षण भिंत व सिमेंट काँक्रिटचे पोल उभे करून काटेरी तार लावण्याचे काम केल्याचे आरोप केले होते. तातडीने हे काम थांबून कारवाई करण्याची मागणी बीबी ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने कोरपनाचे तहसिलदार महेंद्र वाकलेकर यांच्यासह नांदा व बीबी ग्रामपंचायत कडे केली होती.

कोरपना तहसीलदारांनी 30 जून तारखेनंतर या प्रकरणाची मौका चौकशी करण्याकरिता येण्याचे कळविले होते. पण त्याच्या चौकशी पूर्वीच रात्री 10 वाजता काही लोकांनी मुसळे यांच्या शेतातील 20 ते 25 सिमेंट पोल तोडून दिले. अनिल मुसळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी रात्रीच पोलिस स्टेशन ला माहिती दिली. 4-5 शिक्षकांसह पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले परंतु तो पर्यंत सगळे आरोपी पळून गेले होते. अनिल मुसळे यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे ही सांगितले आहे. यात कमालीची बाब ही आहे की अनिल मुसळे आणि बिबी ग्राम पंचायत समिती सदस्य दोन्ही काँग्रेस पक्षाचेच आहे. अनिल मुसळे यांनी या घटनेची माहिती स्थानिक आमदार व मोठ्या नेत्यांनाही दिल्याचे सांगितले आहे.

रात्री 2 वाजताच घटनेचा निषेध करत अनिल मुसळे यांनी सोशल मीडियावर दिली प्रतिक्रिया
"काल रात्री दहा वाजता बिबी ग्रामपंचायत सदस्यांनी दारू पिऊन धिंगाणा घालत माझ्या शेतातील जवळपास 25 पोल तोडून आर्थिक नुकसान केले सदर बाब काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही. कोणतीही लढाई ही कायदेशीर लढली पाहिजे तो आपला हक्क आहे, परंतु आपण समाजाचे पुढारी म्हणून घेत असताना स्वतः दारू पिऊन गुंडगिरी करीत असेल तर ते काँग्रेस संस्कृतीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे. आपण जनतेचे प्रतिनिधी आहों ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. मी स्वतः काँग्रेस पक्षतर्फे निवडणूक लढलो व इतरही पक्षात होतो. परंतु पहिले सेवादालातून काँग्रेस कार्यकर्ता तयार व्हायचा. तोच आता अश्या वागणुकीमुळे गुंडगिरी तयार होताना दिसत आहे. ही बाब निश्चितच धोक्याची सूचना देणारी आहे. पक्षातील वरिष्ठांनी अशा गुंड कार्यकर्त्यांवर वचक ठेवून समाजसाठी विधायक कार्य करावे. माझे नुकसान झाले ते मी भरून काढीन, पण पक्षाचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी. अशा गुंडगिरी मुळे पक्ष कधीच वाढणार नाही. अशी कडक प्रतिक्रिया मुसळे यांनी दिली. अनिल मुसळे यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सदर घटना वरवर बघता सूक्ष्म दिसत असलीतरी स्थानिक पक्षश्रेठींनी याप्रकरणात लक्ष न दिल्यास जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी अवस्था निर्माण होऊन प्रकरण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.

बातम्या अधिक आहेत......

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top