Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: हत्तीरोग दुरीकरणासाठी देणाऱ्या औषधांचे सेवन करा - संजय गजपुरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागभीड - हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र सुरुवात क...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र सुरुवात करण्यात आली आहे. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे याची सुरुवात जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी गोळ्या सेवन करुन केला. सोबतच कुटुंबातील सर्व सदस्य व सरस्वती ज्ञान मंदिर येथील सर्व शिक्षकांनी या गोळ्यांचे सेवन केले.

हत्तीरोगाच्या प्रतिबंधासाठी यावर्षी हत्तीरोगविरोधी तीन प्रकारची औषधे नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये गरोदर माता, दोन वर्षाखालील बालके, अतिगंभीर रुग्ण वगळता सर्वांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष देखरेखीत औषधे खाऊ घालण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी या गोळ्यांचे सेवन करण्याची विनंती जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी केली आहे .

यावेळी प्रा.आ.केंद्र नवेगाव पांडव  च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका मडावी, आरोग्य सहाय्यक वामन बारापात्रे, आरोग्य सेविका अर्चना निखार, आशा वर्कर दृषाली खोब्रागडे व शिल्पा अमृतकर, सरस्वती ज्ञान मंदिर चे मुख्याध्यापक गोकुल पानसे, सहा.शिक्षक आशिष गोंडाने, कु.आशा राजुरकर, किरण गजपुरे, पराग भानारकर, सतिश जिवतोडे यांची उपस्थिती होती. 

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top