- शेततळ्यातील गाळामुळे दोघेही चिखलात रुतले
- कुटुंबियांनी केला मोठा आक्रोश
यवतमाळ -
शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी २० जुलै रोजी दुपारी यवतमाळमधील नांदुरा खुर्द येथे घडली. आकाश राजेंद्र दुतकोर वय १५, रा. नांदुरा खुर्द आणि चेतन सुरेश मसराम वय १५, रा. नांदुरा अशी मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.
नांदुरा खुर्द शेतशिवारातील एका शेतात पिकाला खत टाकण्यासाठी ही शाळकरी मुले गेली होती. काम संपवून घरी परत येत असताना त्यांना पाण्याने भरलेल्या शेततळ्यात पोहण्याचा मोह झाला. त्यानंतर दोघांनी शेततळ्यात सरळ उडी घेतली.
शेततळ्यात साचलेला गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने ते दोघेही चिखलात रुतून बसले. उडी घेतलेली दोन्ही मुले पाण्याच्या बाहेर न आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी या घटनेची माहिती नांदुरा खुर्द येथील ग्रामस्थांना दिली.
ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेत शेततळ्यातून मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला.
बातम्या अधिक आहेत.....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.