Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदार स्थानिक विकास निधी व खनिज निधीतून मंजूर १ कोटी ४३ लक्ष रुपयांच्या पाणीपूरवठ्याची कामे तात्काळ सुरु करा - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनपाला जागविण्यासाठी भजन आंदोलन, यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - शहरातील पाणी समस्या सुटावी या करीता ...
  • मनपाला जागविण्यासाठी भजन आंदोलन, यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शहरातील पाणी समस्या सुटावी या करीता उपाययोजना करण्यासाठी आमदार निधी व खनीज विकास निधीतून 1 कोटी 43 लक्ष रुपयांचा निधी महानगर पालिका प्रशासनाला दिला. या कामाची निवीदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता नियमानुसार हि मंजूर कामे तात्काळ सुरु होणे आवश्यक असतांना सुध्दा या कामांना विलंब होत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला असून मनपा जाग व सदबुध्दि यावी याकरीता हे आंदोलन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. तसेच हे कामे तात्काळ सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आमदार स्थानिक विकास निधी व खनिज निधीतून मंजूर 1 कोटी ४३ लक्ष  रुपयांच्या पाणीपूरवठ्याची कामे तात्काळ सुरु करण्यात यावी या करीता आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात महानगर पालिकेत भजन आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, जितेश कुळमेथे, विश्वजीत शाहा, विलास वनकर, राशिद हुसेन, विलास सोमलवार, सलिम शेख, मुन्ना जोगी, अजय दुर्गे, विनोद अनंतवार, आनंद रणशूर, आंनद इंगळे, बबलू मेश्राम, दिनेश इंगळे, राम जंगम, नितिन शाहा यांच्यासह यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, सायली येरणे, भाग्येश्री हांडे, दुर्गा वैरागडे, कल्पना शिंदे, सविता दंडारे, विमल काटकर, वैशाली मेश्राम, कौसर खान, माधूरी काळे, रुपा परसराम, आशा देशमूख, वैशाली रामटेके, प्रमीला बावने, अस्मिता डोनारकर, अल्का मेश्राम, अनिता झाडे, वैशाली मद्दीवार, माधूरी उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top