Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ब्रेकिंग न्यूज - चंद्रपुरात भर दिवसा गोळीबार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अत्यंत गजबजलेल्या भागात  झाळल्या गोळ्या शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी बुरखा घालून आलेल्या एका युवकाने गोळीबार केला. यात एक युवक जखमी झाल...
  • अत्यंत गजबजलेल्या भागात  झाळल्या गोळ्या
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बुरखा घालून आलेल्या एका युवकाने गोळीबार केला. यात एक युवक जखमी झाला. जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी भर दुपारी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहेत.
मिळालेल्या मोहितीनुसार गोळीबार होताच सदर व्यक्ती स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शेजारील एम.आय. मोबाईल शोरूम मधे दडून बसला. दरम्यान आरोपी पळुन गेला. ह्या प्रकरणाचे तार बल्लारपूर शहराशी जोडल्या गेले असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. 
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, शहर पोलीस निरीक्षक बहादुरे व पोलीस टीम मोक्यावर दाखल झाली असुन पोलीस कारवाई सुरू आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top