Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गांधीनगर नदी घाटावर पुलाची निर्मिती करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, पैनगंगा नदीवरील गांधीनगर - तेजापुर नदी घाटावर पुलाची निर्...
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, पैनगंगा नदीवरील गांधीनगर - तेजापुर नदी घाटावर पुलाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होते आहे. या नदीघाटावर सद्यस्थितीत पूल नसल्याने नागरिकांना नावे द्वारे जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. हा पूल झाल्यास जिल्ह्यातील कोरपना व यवतमाळ जिल्ह्यातील वणी व झरी जामणी तालुक्यातील गावे एकमेकाशी जोडली जाईल. दळणवळणाची सोय निर्माण होऊन वेळ व कमी अंतरात नागरिकांना जाणे-येणे सोपे होईल. तसेच या दुर्लक्षित भागाचा विकास होऊन औद्योगिक क्रांती नांदेल. गणेशपुर ते कोरपना पर्यंतचा थेट मार्ग सुलभ होईल. या अनुषंगाने चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग यांनी यासाठी ठोस पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top