- जीवघेणे ठरू शकते सेल्फीचे नाद
- पोलिस बंदोबस्त वाढवण्याची शरद जोगी यांची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
मागील आठवड्यात २-३ दिवस झालेल्या सारख्या पावसामुळे गडचांदुर ला लागून असलेले अमलनाला प्रकल्प पूर्ण पणे भरून गेले आहे. लागूनच असलेले डोंगर पूर्णपणे हिरवीगार वृक्षांनी आच्छादित होऊन संपूर्ण परिसराला निसर्गरम्य सुंदर, आकर्षक आणि मनमोहक असे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अमलणाला धरण पूर्णतः भरल्याने बांधातील पाणी ओव्हरफ्लो होऊन येथील वेस्ट वेअरच्या मार्गाने बाहेर पडत आहे. त्यामुळे वेस्ट वेअर परिसराला अलौकिक सौंदर्य प्राप्त झाले आहे आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य बघण्यास स्थानीय लोकांची गर्दी वाढली आहे. कोरोना मुळे सारखे घरात बसून लोकं कंटाळले होते. उन्हाळ्यात सगळी वॉटर पार्क पण बंदच होती. त्यामुळे आजच्या नवीन पिढीचे सेल्फी वीर युवक आणि युवती अमल नाला परिसरातील सुंदर आणि मनमोहक दृश्य सोशल मीडिया वर आपली सेल्फी फोटो आणि ग्रुप फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करत असल्यामुळे अमल नाला हे पर्यटन स्थळ झपाट्याने प्रसिद्ध होत आहे. चंद्रपूर, वरोरा, वणी, पांढरकवडा, मारेगाव, तेलंगणातील व तेलंगणातील आदिलाबाद, असिफाबाद, मंचिरियल, वाकडी आदी भागांतील निसर्गप्रेमी पर्यटक नागरिक पाण्याचा आनंद लुटण्साठी दूर दूर वरून येत असल्यामुळे पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे.
![]() |
पाण्याचे आनंद घेताना जोडपं |
आताच काही दिवसापूर्वी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टवार, खासदार बाळू धानोरकर, राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत विकास कामांचे भूमिूजन करून अमलनाला परिसराच्या विकासासाठी ९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु सध्या तरी येथे कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध नाही आणि मोठ्या संख्येने पर्यटका मुळे येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ओव्हर फ्लो पाण्यालाही जास्त वेग असल्यामुळे आणि मातीच्या गार मिश्रित चिकट पाण्यामुळे घसरून पडून येथे कधीही अप्रिय दुर्घटना होऊ शकते. काही नागरिक पाण्यात खेळता खेळता जास्त खोल पाण्यात आणि मोठ्या प्रवाहात सुद्धा जाताना दिसत आहे. सेल्फीच्या नादात उंचीवर चढून, पाण्यात आडवे झोपून आणि विविध पोज मध्ये फोटो काढण्याकरिता केलेले उपक्रम जीवघेणे ठरू शकते. अजून पर्यंत येथे कोणतीच जीव हानी झालेली नाही आहे. मात्र वेळेवर लक्ष न दिल्यास येथे कधीही अप्रिय घटना घडू शकते. शिवाय मोठ्या प्रमाणात लहान मोठे वाहन येत आहेत आणि पार्किंग ची व्यवस्था नसल्यामुळे रोड जाम ही लागत आहे. मार्ग अरुंद असल्यामुळे वाहन घसरून फसण्याची किंवा खाली पडण्याची भीती असते. प्रशासनाने लवकरात लवकर पोलिस बंदोबस्त लावून लोकांच्या जीवनाची सुरक्षा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरपना तालुका अध्यक्ष व गडचादुर नगरपरिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.