- अंबुजा सिमेंटचे अधिकारी यांचा अभ्यास दौऱ्यात सहभाग
- कोंडवाडयाचे वाचनालयात रुपांतर करणारे पहिले गाव
राजुरा -
राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, गावकऱ्याची नियमित सकाळी 4:30 वाजता श्रमदानातून स्वच्छता, सौंदर्यानी व फुलांनी नटलेला बंगीचा, गावाच्या मध्यभागी कोंडवाडयातून रुपांतर केलेले सार्वजनिक वाचनालय. सुंदर शालेय परिसर, शालेय परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली व्यायामशाळा तसेच सर्व धर्मीय संस्कृतीचे संरक्षण इत्यादी विकास कामाची पाहणी करण्यासाठी भंडारा येथील अशोक लेलॅन्ड कंपनीचे युनिट हेड जोशी व त्यांचे सोबत असलेले मेंढे आणि पुरंदरे तसेच या चमूसोबत अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, विभाग प्रमुख जितेंद्र बैस, संतोष विश्रोजवार तथा ज्योती खंडाळे यांनी भर पावसात भेट देवून पाहाणी केली. सर्व प्रथम सर्व भेट देणारे चमू सदस्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
माजी उपसरपंच वासुदेवजी चापले यांनी स्मार्ट ग्राम तयार होण्याचा प्रवास कसा झाला हे सांगताना सन 2012 पासून ग्रामस्थ व युवकांनी सातत्याने दररोज पहाटे 4:30 वाजता पासून 2 तास ग्राम स्वच्छतेसाठी श्रमदान करीत आहे. पुढेपण सातत्याने सुरु राहणार असल्याचे खात्रीपुर्वक सांगितले. ही बाब अभ्यास दौऱ्यातून पाहणी करतांना स्वच्छता पाहून तर भाराहून गेले. यानंतर संपूर्ण गावाची पाहणी करण्यात आली. पाहणी करताना दृष्यस्वरुपात गावातील नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, सुंदर व मनमोहक बगीचा, सौंदर्यात्मक प्रवेशव्दार, गावाची सातत्याने होणारी स्वच्छता, गावाच्या बाहेरील रोडची श्रमदानातून होणारी स्वच्छता, 2250 वृक्षांचे वृक्षारोपन व संवर्धन, स्वच्छ शालेय परिसर, शाळा बंद पण शिक्षण सुरु, 100 टक्के करवसुलीचे प्रयत्न, युवक - युवतीसाठी विविध स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण वर्ग तसेच ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी ISO होण्यासाठीचे नियोजन इत्यादी नाविण्यपूर्ण उपक्रम दाखविण्यात आले. या विकास कार्यात अंबुजा सिमेंट फाऊन्डेशनचे अनमोल मार्गदर्शन तथा सहकार्य मिळत असल्याचे मनोगतातून व्यक्त केले.
स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) येथील श्रमादानाची व विकास कामाची पाहाणी करण्यासाठी संपूर्ण गावाचे दर्शन माजी उपसरपंच वासुदेव चापले व ग्रामपंचायतचचे माजी सदस्य शंकर तोडासे, शिल्पाताई कोडापे तथा ग्रामसेवक गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे तसेच ग्रामस्थ गणपत चापले यांचे नेतृत्वात करण्यात आले. मंगी (बु) हे शाश्वत विकासाचे नाविण्यपूर्ण मॉडेल असल्याचे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.