Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अवघ्या दोन तासात स्थानिक गुन्हे शाखेने ट्रक चोराच्या मुसक्या आवळल्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपुर जिल्हयात मागील काही दिवसांपासुन वाहन चोरीच्या गुन्हयात वाढ झाली असतांना अशा गुन्हयांवर...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपुर जिल्हयात मागील काही दिवसांपासुन वाहन चोरीच्या गुन्हयात वाढ झाली असतांना अशा गुन्हयांवर आळा घालण्यासाठी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपुर अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. अशातच दिनांक २६/०७/२०२१ रोजी चे रात्री ०८:०० वाजताचे सुमारास पोलीस स्टेशन पडोली हदीत सरकारी धान्याच्या ट्रक क्र. एमएच ३४ बीजी ३९०७ हा त्रिमूर्ती होटेलजवळुन अज्ञात इसमांने चोरी केला. यावरून पोलीस स्टेशन पडोली येथे अप.क. ११२/२०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ट्रक चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल होताच याबाबत माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात गोपनीय माहिती काढण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक वेगवेगळया दिशेन रवाना होवुन ट्रकचा शोध सुरू केला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक खाडे यांना आणि त्यांचे अधिनस्त पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा चोरीस गेलेला ट्रक हा बल्लारशाहच्या दिशेने गेलेला आहे. अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने सदर ट्रक विसापुर टोलनाक्याजवळ अडवुन ट्रक चालवित असलेला इसम आरोपी नामे दिगांबर बापुराव केंद्रे वय २६ रा. वंजारी गुडा, पो. लिंगापुर, ता. शिरपुर, जि. आदिलाबाद तेलंगाना यास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेला माल २० टन शासकीय धान्य किंमत ४,००,००० रू आणि ट्रक किंमत ११,००,००० असा एकुण १५,००,००० रू चा मुददेमाल हस्तगत केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपुर अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोनि बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, सफौ राजेंद्र खनके, पोहवा महेंद्र भुजाडे, पोना जमीर खान, मिलींद चव्हाण, अनुप डांगे, पोशि गणेश भोयर, प्रदीप मडावी, गणेश मोहुर्ले, गोपीनाथ नरोटे, विनोद जाधव यांनी केली. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top