चंद्रपूर -
दिनांक 25 जुलै 2021 रोजी धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, शाखा - चंद्रपूर द्वारे धम्म वाचनालय हॉल, उर्जानगर कॉलनी येथे संघटना संवाद सभेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य शाखेचे अध्यक्ष अनिल कुमार ढोले नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाना पांडे, कोर कमिटी सदस्य, विलासराव डाखोडे उपाध्यक्ष, उज्वल रोकडे कोषाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात सभेला सुरुवात झाली. प्रथम अनिल कुमार ढोले यांच्या हस्ते लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांना स्थानापन्न करून
पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सदस्यांचा परिचय देण्यात आला. धनगर अधिकारी कर्मचारी संघटना शाखा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष प्रवीण बुच्चे राजूरा यांनी प्रास्ताविक. त्यांनी संघटनेची एक वर्षातील वाटचाल, तीन तालुक्यात कार्यकारिणीची स्थापना व पुढील संघटनेची रुपरेखा, दिशा स्पष्ट केली. जिल्हा कार्यकारणी बळकट करण्यासाठी कार्यकारिणीचा विस्तार करण्याचे सांगितले. जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा गट करून प्रत्येक गटात एक उपाध्यक्ष, संघटक, सचिव ठेवून सर्व तालुक्यांना प्रतिनिधित्व देण्याचे ठरले. त्यानंतर संघटनेचे जिल्हा कार्यकारणी संघटक संजयराव बोधे, वरोरा यांनी संघटनेचे महत्त्व आपल्या भाषणातून विषद केले. ही अराजकीय संघटना असून सर्वांनी मिळून सहकार्य करून जास्तीत जास्त समाज बांधवांना पर्यंत संघटनेचे कार्य व विस्तार पोचण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची त्यांनी विनंती केली. संघटनेत सक्रिय राहून आपल्या समाज बांधवांची कशी मदत करता येईल, पोट जातीत रोटी-बेटी व्यवहार कसे सुरु करता येईल, गरजू व अन्यायग्रस्त बांधवांना त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेचे लेटरपॅड चा वापर कसा करता येईल, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष विलासराव डाखोडे, नागपूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक समाजाचे सभागृह आहेत परंतु, धनगर समाजाचे एकही सभागृह दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येकाने संघटनेशी जुळून दबावगट तयार करावा व आपल्या समाज बांधवावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध संघटनेचे लेटरपॅडवर करावा अशी त्यांनी विनंती केली. त्यानंतर अध्यक्षीय भाषण करण्याकरिता धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले यांनी विस्तृत कायदेशीर बाबी ला धरून अधिसंख्यपदा बाबतीत मार्गदर्शन केले व या पदाचा जीआर कसा अन्याय पूर्वक आहे. जीआर मागील पार्श्वभूमी काय होती आणि भविष्यात धनगर समाजाला कोणत्या अडचणी येऊ शकतील आपले आरक्षण संपवण्यासाठी विरोधक कसे प्रयत्न करत आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी आता संघटित होणे फार गरजेचे आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विस्तृतपणे सांगितले. बहिरा केसमुळे आलेली परिस्थिती याबद्दल त्यांनी विविध उदाहरणे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित सभासदांपैकी पोलीस उपनिरीक्षक वणी नरेश शेळकी यांनी त्यांना विभागाच्या चुकीने कसे अधिसंख्य ठरवले यांची आपबीती सांगितली. विचारलेल्या शंकेचे समाधान केले व संघटनेचे सभासद होऊन आपल्यासारख्या अन्यायग्रस्त धनगर अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्नासाठी झटावे ही विनंती केली.
श्रीमती मीरा यारेवार ,अधिपरिचारिका यांनी अधिसंख्य आदेशा बाबत त्यांनी प्रश्न विचारले असता त्यांचे शंकेचे समाधान केले. लवकरच अधिसंख्य पदाच्या केसचा निकाल लागेल, तो निकाल लागल्यानंतर आपण पुढील दिशा ठरवू असे त्यांनी सांगितले.
संचालन हेमंतकुमार ढोले ऊर्जानगर यांनी केले. उत्तमराव रोकडे, शंकरराव दरेकर, विजयराव आस्कर, लक्ष्मण सरवदे, राम बोंबले, सुनिल गवळे, अमोल जानकर, राजेंद्र लांडे, धर्मेंद्र आस्कर, विलास उगे व उर्जानगर चमूने विशेष प्रयत्न करून सभा यशस्वी करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता औषध नि अधिकारी राजेश ढाले, पोलीस उपनिरीक्षक नरेश शेरकी, विठ्ठल मात्रे, भगवान दंडवते, रामकिसन चिडे, बालाजी नंदगावे, दशरथ धावणे, रुपेश चिडे , श्रीमती मीरा यारेवार, काशिनाथ बोधे, गणपत येवले, राजेंद्र लांडे, बंडू बुच्चे, महेश गोरे, जगदीश चोरमल्ले, एन. डी. खरबे, प्रवीण बुच्चे, विवेक तास्के, संजय बोधे व कैलास उरकुडे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.