Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वृक्षसंवर्धन ही सामूहिक जबाबदारी - अरुण धोटे नगराध्यक्ष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुप कडून नर्सरी मार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण १५०० वृक्षलागवडीचा संकल्प अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी...

  • इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुप कडून नर्सरी मार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण
  • १५०० वृक्षलागवडीचा संकल्प
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -

राजुरा शहरातील इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुप कडून शहरालगत असलेल्या वनविभागाच्या नर्सरी मार्गाची स्वच्छता करण्यात आली. या मार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली. या मार्गावरील काचेच्या व पाण्याचा रिकाम्या बॉटल्स, वेफर्सचे प्लास्टिक आवरण व अन्य पदार्थ जमा करण्यात आले. या मार्गावर पहाटे आणि सायंकाळी मैदानी खेळाचा सराव करणार मुलं, व्यायामासाठी येणारे जेष्ठ नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवीत वृक्षारोपण केले. यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, नगरसेवक राजेंद्र डोहे, गजानन भटारकर, भाउजी कन्नाके, हरजीतसिंग संधू, आरपीआय (आ.) जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, नेफडो चे नागपूर विभाग सचिव बादल बेले, संतोष देरकर, घनश्याम हिंगाने, सुधाकर चांदेकर, राजू धोटे, सामाजिक वणिकरण विभागाचे वनपाल विलास कुंदोजवार, गिरडकर, गजानन सावनकर, प्रदीप कडवाने, आसिफ सय्यद, जेष्ठ नागरिक बाणकर आदींची उपस्थिति होती. यावेळी नगराध्यक्ष धोटे यांनी युवकांनी वृक्षारोपण करण्याच्या संकल्पाचे कौतूक करीत ही सामूहिक जबाबदारी असून झाडे लावणे आणि मोठ्या प्रमाणात जगवणे अत्यंत महत्वाचे आहे त्याकरिता इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या युवकांनी एकत्र येत शुक्रवार रोजी सांयकाळी या मार्गावरील स्वच्छता करत वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार बंडू बोढे, प्रास्ताविक आकाश वाटेकर यांनी केले. वृक्षारोपणाच्या यशस्वितेकरिता चेतन सातपुते, सतिश बानकर, जगदीश साठोने, आकाश वाटेवर, भुपेंद्र साठोने, बबलू चव्हाण, प्रज्वल उराडे, राहुल पिदूरकर, विकी भोज, दिनेश ठाकरे, पवन पिंपळशेंडे, शुभम सोयाम, पचारे, अक्षय गावंडे, संदीप मडावी, दिनेश कवलकर, उमेश मंगुळकर, गजानन बेले, लुकेश बुतले, विजय काळे, सुधीर लोणारे, नागेश जाधव, विशाल मंढरे यांनी परिश्रम घेतले.  








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top